Stray Dogs | दारात लाल-निळ्या रंगाची बॉटल ठेवली की भटकी कुत्री पळून जातात? नक्की खरं काय? कुत्री लाल रंगाला घाबरतात की?... - डिजिटल शेतकरी

Stray Dogs | दारात लाल-निळ्या रंगाची बॉटल ठेवली की भटकी कुत्री पळून जातात? नक्की खरं काय? कुत्री लाल रंगाला घाबरतात की?…

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) वावर सर्वत्र असतो आणि काही दिलदार लोक त्यांना खाऊ घालत असतात, तर काही कुत्री स्वतःचं अन्न स्वतः शोधत आपआपली वाट पकडत असतात. काही कुत्री जेवणाच्या शोधात सोसायटी किंवा चाळीत जाऊन पोहचतात आणि चाळ किंवा सोसायटी बाहेर आपण पहिलंच असेल की, तिकडे पारदर्शक बॉटलमध्ये लाल किंवा निळ्या रंगाचे पाणी भरून लटकवली जात असते. या पाण्याला पाहून कुत्री घाबरतात, असे म्हटले जाते आहे (Social Viral).

पण यात तथ्य किती? लाल रंगाचे पाणी पाहून खरंच कुत्री घाबरतात का? यामुळे कुत्री भुंकणे किंवा त्यांचा सोसायटी बाहेर असलेला वावर कमी होतो का? आज पाहूयात(Red liquid a day keeps stray dogs at bay).

जंगली आणि शहरातील कुत्र्यांच्या डोळ्यातील अंतर

इटलीतील बारी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, कुत्र्यांचे डोळे तपासण्याची नवी पद्धत विकसित केली आहे आणि काही कुत्र्यांना लाल आणि हिरवा रंग ओळखण्यात अडचण निर्माण होत असते. त्यामुळे भटके कुत्री दिवसा कमी रात्रीच्या वेळेस त्यांचा वावर जास्त वाढत असतो. शहरी भागातील लोकांच्या वर्दळीमुळे कुत्र्यांना एकाच जागी राहणं कठीण होऊन जात असते आणि त्यामुळे ते दिवसभर फिरत असतात.

कुत्र्यांना लाल-निळ्या रंगाची भीती का वाटते?

यासंदर्भात, बारी विद्यापीठाचे मार्सेल सिनसिंची सांगतात, ‘कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग दिसत नाही आणि असं नाही की, या रंगाचे वस्तू, त्यांच्या डोळ्यांसमोरून गायब होत असतात. मात्र, त्या वस्तूच्या मागे काय आहे ते कुत्र्यांना दिसत असते. कलर ब्लाइंडनेसमुळे कुत्र्यांना लाल आणि निळा रंग पाहण्यात त्रास होत असतो. त्यामुळे ते लाल किंवा निळ्या रंगाची वस्तू दिसताच तेथून पळ काढत असतात.Stray Dogs

कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय? यामुळे डोळ्यांमध्ये कोणते बदल होतात?

Stray Dogs: रंगांधळेपणा म्हणजे रंग स्वतंत्रपणे ओळखण्यात येणारी अडचण आणि यामध्ये काहींना विशिष्ट रंग ओळखण्यात त्रास होत असतो. विशेषत: लाल, हिरवा आणि कधीकधी निळा रंग, ओळखण्यात त्यांची तारांबळ उडत असते. यामुळे कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग ओळखण्यात अडचण येत असते. प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये दोन प्रकारच्या पेशी आढळत असतात. शंकू आणि शलाका पेशी. शंकू पेशी असलेल्यांना उजेडात सर्वकाही दिसते पण शलाका पेशी असणाऱ्यांना मंद प्रकाशात दिसण्यात अडचण निर्माण होत नाही.

मानवी डोळ्यांमध्ये शंकू पेशी जास्त प्रमाणात असते आणि तर, रॉड्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अंधारात आपल्याला दिसण्यात अडचण येत असते. तर कुत्र्यांमध्ये शंकू कमी प्रमाणात आणि रॉड जास्त प्रमाणात आढळत असतात. या कारणास्तव कुत्र्यांचा वावर हा रात्री जास्त असतो.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत…

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा.

Leave a Comment