Weather Update : राज्यासह देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग आणि दिशा पाहता एक नवी प्रणाली सक्रिय होत असून, त्यामुळं याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसणार आहे.मागील 24 तासांमध्ये उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली असतानाच पुढील 24 तासांमध्येही हे चित्र फारसं बदलणार नसल्याचच बातमी समोर येत आहे Weather Update.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता असून, याच धर्तीवर इथं ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आले आहे तसेच विदर्भ ते केरळाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं त्याच्या परिणामस्वरुप राज्यात सध्या जोरदार पूर्वमोसमी पावसाची हजेरी पाहायला मिळणार देखील आहे. तिथं विदर्भाला पावसाचा इशारा असतानाच इथं कोकण, मध्य महाराष्ट्रालाही वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला गेला आहे.
चक्रीवादळामुळं पाऊस थैमान घालणार
बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागानं वर्तवली आहे आणि प्राथमिक स्वरुपात शक्ती असं या चक्रीवादळाचं नाव सांगण्यात येत आहे. ज्या धर्तीवर 16 ते 18 मे या दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्रतेनं सक्रिय होणार असून त्यामुळं कर्नाटकाचील बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसू शकत आहे. तर, कोलकाता इथं मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकनार आहे.
Weather Update पुढील 24 तासांमध्ये गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, छत्तीसगढ, सिक्कीम, कर्नाटक, तामिळनाडू केरळ, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश या भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि तर, गोवा आणि कोकणात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करत यामुळं जनजीवन विस्कळीतही होऊ शकतं अशा शब्दांत नागरिकांना सतर्क केलं गेले आहे.
फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर
वाऱ्याचा ताशी वेग 50- 60 किमी… सावध व्हा!
हवामान विभागानं Weather Update जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 16 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग सातत्यानं वाढणार असून हा वेग 50 ते 60, 70 किमी प्रतितास इतका आकडाही ओलांडू शकतो आणि त्यामुळं यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर गुजरातलाही या हवामान प्रणालीचा फटका बसणार असून इथंही पावसाटा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा