मुलीच्या भविष्याचा विचार करताय? सुकन्या समृद्धी योजना ठरेल फायद्याची 2023 - डिजिटल शेतकरी

मुलीच्या भविष्याचा विचार करताय? सुकन्या समृद्धी योजना ठरेल फायद्याची 2023

सुकन्या समृद्धी योजना ही एक भारत सरकारची वित्तीय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीच्या भविष्यातील विद्याप्राप्ती, उच्च शिक्षण, विवाह आणि उद्योजकता या सर्व गोष्टींसाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुख्यतः पोस्ट ऑफिस, सरकारी बँकांअंतर्गत खाते उघडून गुंतवणूक करू शकता. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता :

▪️ सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
▪️ सुकन्या समृद्धी योजना खाते फक्त मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
▪️ खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
▪️ मुलीला एकापेक्षा जास्त खाते उघडता येत नाही.
▪️ कुटुंबातील फक्त दोन मुलींच्या नावे खाते उघडता येते.

सुकन्या योजना फोर्म

प्रीमियम कसा असेल पहा :

 वर्ष प्रतिवर्ष जमा राशि (₹) अर्जित ब्याज (₹) साल के अत में कुल राशि
2015 100000 7600 107600
2016 100000 15777.6 223377.6
2017 100000 24576.70 347954.30
2018 100000 34044.53 481998.82
2019 100000 44231.91 626230.73
2020 100000 55193.54 781424.27
2021 100000 66988.24 948412.52
2022 100000 79679.35 1128091.87
2023 100000 93334.98 1321426.85
2024 100000 108028.44 1529455.29
2025 100000 123838.60 1753293.89
2026 100000 140850.34 1994144.23
2027 100000 159154.96 2253299.19
2028 100000 178850.74 2532149.93
2029 100000 200043.39 2832193.32
2030 0 215246.69 3047440.01
2031 0 231605.44 3279045.45
2032 0 249207.45 3528252.91
2033 0 268147.22 3796400.13
2034 0 288526.41 4084926.54
2035 0 310454.42 ₹4395380.96

या बँकेत खोलू शकता खाते

  • भारतीय स्टेट बैंक
  • बैंक ऑफ़ बड़ोदा
  • पंजाब नेशनल बैंक
  • बैंक ऑफ़ इंडिया
  • इंडियन बैंक
  • पोस्ट ऑफिस

थंडीच्या दिवसांत सकाळी जागच येत नाही? ५ गोष्टी करा, अलार्म न लावता जाग येईल-फ्रेश वाटेल

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment