मनोज जरांगें: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि सरकारला दिलेला वेळ संपत आहे. राज्य सराकरने २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असून या तसेच उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाजाने सरकारला जागे करण्यासाठी एकत्र यावे आणि व शांततेत आंदोलन करावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मिरी मध्ये राजकीय पुढार्यांना बंदी पहा व्हिडीओ
पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिले तर गुलाल भरुन गाड्या येतील आणि नाहीतर माणसं भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र आंदोलन शांततेत होणार आणि संपूर्ण देश शांततेचं युद्ध कसं असतं हे पाहणार आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने आमचे लोक आमच्या विरोधात उतरवले आहेत…मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं. कुणीही आत्महत्या करु नये तसेच राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला ४० दिवस देऊन सन्मान केला. आता २५ तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला गेला आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर, 20 रुपयांपासून सुरू होणार प्रीमियम