Goat Farming : गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन 2022 - डिजिटल शेतकरी

Goat Farming : गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन 2022

पावसाळ्याच्या काळात शेळ्यांच्या गोठ्यातील (Goat Shed) छताची गळती त्वरित बंद करावी आणि  गोठ्यात पावसाचे पाणी असल्यास शेळ्यांमध्ये आजारांचे (Goat Disease) प्रमाण वाढत असते. दुर्गंधीयुक्त वातावरणाचे प्रमाण वाढून डोळे, खूर व श्‍वास-नलिकेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जंतुसंसर्ग (Bacterial Infection Due To Humidity) आजार होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. रात्रीच्या वातावरणातील तापमान कमी होऊन शेळ्यांना थंडी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे गोठा रात्री बंदिस्त ठेवत असतात. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे गाभण शेळ्यांमध्ये (Pregnant Goat ) कासेचे आजार होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. म्हणून गोठा हा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवायचा असतो.

goat

आहार आणि पाणी नियोजन :

१) गवतावर दव असताना शेळ्यांना परिसरात सकाळी बाहेरील वातावरणात चरण्यासाठी सोडू नका.

२) ओल्या चाऱ्याची साठवणूक केल्यास त्याला बुरशी लागण्याची शक्यता आहे आणि  असा चारा खाल्ल्याने शेळ्यांमध्ये पोटाचे विकार, गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ओल्या चाऱ्याची साठवणूक करू नका.

३) ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि  परिणामी, त्यांना लागणारे आवश्यक घटक मिळत नाहीत म्हणून आहारात ओल्या चाऱ्यासोबातच सुक्या चाऱ्याचा समावेश करावा लागत असतो.

४) बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा हा उंचावर टांगून ठेवावा, जेणेकरून तो तुडवला जाणार नाही आणि खराब होणार नाही.

५) गाभण शेळ्यांना २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.

हे हि वाचा : बंदिस्त शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

संभाव्य आजारावर प्राथमिक उपाय :

१) पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाभण शेळ्यांना जंतुनाशक दिले पाहिजे.

२) सर्दी, बुळकांडी, हगवण इ आणि  सारख्या आजारापासून शेळ्यांचा वेळीच बचाव करावा.

३) गोठ्या शेजारी साठलेल्या पाण्यामुळे माश्या, डास, गोचीड यांचे प्रमाण वाढत असते. हे सर्व घटक आजार पसरविण्यासाठी कारणीभूत ठरत  असतात आणि  म्हणून पाण्याचा साठा गोठ्यामध्ये होऊ देऊ नये.

४) पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्‍या बसून त्या चिघळणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. माशांवर नियंत्रण आणावे आणि  कडुनिंब, निरगुडी, करंज पाला किंवा औषधाचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

५) आजाराचे प्राथमिक लक्षण दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करावे लागतात.

गाभण शेळ्यांची निगा :

१) शेळ्या विण्याच्या एक महिना आधी आणि विल्यानंतर एक महिना खुराक द्यावा लागतो.

२) गाभण शेळ्यांचा आहार संतुलित असावा आणि त्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व, पाण्याचे योग्य प्रमाण असावे.

३) गाभण शेळ्यांना दररोज अडीचशे ते तीनशे ग्रॅम जास्त खुराक द्यावा लागत असतो आवश्यक हिरवा चारा आणि वाळलेला चारा द्यावा.

४) शेळी विण्याच्या एक आठवडा आधी हिरव्या वैरणीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी सकस वैरण द्यावी लागती.

५) गाभण काळातील शेवटच्या आठवड्यात शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये आणि  गाभण शेळ्यांना कळपात न ठेवता इतरांपेक्षा वेगळे ठेवावे. शेवटच्या आठ दिवसांत खुराक शंभर ग्रॅमने कमी कराव्या लागत असतात.

६) विण्याची तारीख नोंद करून ठेवावी आणि  त्यावर लक्ष ठेवावे. शेळी विण्याच्या वेळी आडल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment