Rice Price : सामान्यांसाठी मोठा झटका, तांदळाच्या किंमतीत होणार वाढ; सरकारनं सांगितलं आहे मोठ कारण 2022 - डिजिटल शेतकरी

Rice Price : सामान्यांसाठी मोठा झटका, तांदळाच्या किंमतीत होणार वाढ; सरकारनं सांगितलं आहे मोठ कारण 2022

Rice Price Today: आगामी काळात तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीप हंगामात कमी उत्पन्नाचा अंदाज आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत ११ टक्क्यांची वाढ लक्षात घेता ही (Rice Price) दरवाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे तसेच अन्न मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली.

निर्यात धोरणात बदल

मंत्रालयाने दिलेल्या माहितीत, भारताच्या तांदूळ (Rice Price)निर्यात धोरणात नुकत्याच झालेल्या सुधारणांमागील तपशीलवार कारणे स्पष्ट करण्यात येत आहे. भारताच्या तांदूळ निर्यात नियमांमध्ये अलीकडील बदलांमुळे निर्यातीसाठी उपलब्धता कमी न करता देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती  आणि बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लादले जात होते. “देशांतर्गत तांदळाच्या किमती वाढीचा कल दर्शवित आहेत आणि सुमारे 6 दशलक्ष टन धानाचे कमी उत्पादन आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज असल्यामुळे त्यात वाढ कायम राहू शकते,” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे हि वाचा : अन्नधान्य खरेदीमध्येही आता खासगी कंपन्या! केंद्राचे सर्व राज्यांना पत्र

भारत दुसरा मोठा उत्पादक

चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश  ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत भारतातील तांदळाचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे आणि त्यात 34.9 लाख टन बासमती तांदूळ होता. भारतातील चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झालीली दिसत  आहे. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला गेला आहे.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “Rice Price : सामान्यांसाठी मोठा झटका, तांदळाच्या किंमतीत होणार वाढ; सरकारनं सांगितलं आहे मोठ कारण 2022”

Leave a Comment