Cocopeat: उसाच्या पाचटाचा हा उपयोग माहित आहे का? 2022 - डिजिटल शेतकरी

Cocopeat: उसाच्या पाचटाचा हा उपयोग माहित आहे का? 2022

रोपवाटिका(Cocopeat) व्यवसायात पिशव्यात अगर कुंड्यांमध्ये भरण्यासाठी पीट (Peat) नामक एका नैसर्गिक सेंद्रिय माध्यमाचा वापर केला जात असतो. भारतात नैसर्गिक पीट दुर्मिळ असल्याने त्याला पर्याय म्हणून काथ्या उद्योगात निर्माण होणाऱ्या कथ्या कुटापासून बनविलेला कोकोपीट (Cocopeat) हा पदार्थ भारतात सर्वत्र वापरला जात असतो. कोकोपीट बनविण्याचा फार मोठा उद्योग केरळात चालत आहे.  आणि पुणे येथील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) संस्थेने याच गुणधर्माचा पदार्थ उसाच्या पाचटापासून बनविण्यात यश मिळवले आहे.

Cocopeat

माध्यम कसे तयार करायचे?

– उसाचे पाचट लवकर Cocopeat कुजत नाही व त्याचा पशुखाद्य म्हणूनही काही उपयोग होत नाही आणि  म्हणून शेतकरी ते शेतातच जाळून टाकतात. तसेच  पाचट लवकर न कुजन्याचे मुख्य कारण म्हणजे कुजन्याच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सूक्ष्मजीवांना त्यात कोणतेच खाद्य उपलब्ध नसते.

– या जंतूंना खाद्य म्हणून वाळलेल्या एक टन पाचटाच सुमारे दहा किलो शेण मिसळावे लागते. तसेच या पाचटावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी  या बुरशीची प्रक्रिया केल्यास पाचटाच्या पेशीच्या पेशीभित्तिकांमधले सेल्युलोज विरघळते. त्यामुळे ते कुजण्याच्या प्रक्रियेला मदत होते.

– एक टन(Cocopeat) पाचटा मागे ट्रायकोडर्मा व्हिरिडीचे सुमारे ५०० ग्रॅम संवर्धन लागते आणि  शेणात २०० लिटर पाणी मिसळून त्याचा काला करावा. याच काल्यात १०-१२  किलो सुपर फॉस्फेट आणि ८ किलो युरिया मिसळावा.

– कडबा कापण्याच्या यंत्राने पाचटाचे एक ते तीन सेमी आकाराचे तुकडे करावेत आणि  हे तुकडे शेणकाल्यात भिजवावेत. या भिजलेल्या पाचटाचे पंधरा सेमी उंचीचे एकावर एक थर रचून त्यांचा एक ढीग करावा लागतो.

थर रचताना प्रत्येक थर रचून झाला की त्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडीच्या संवर्धनाची भुकटी पसरावी आणि  हा ढीग शक्यतो एखाद्या झाडाखाली सावलीत करावा. म्हणजे तो वाळत नाही. दर आठवड्यातून एकदा या ढीगावर पाणी मारून तो फावड्याने हलवून खाली वर करावा व त्याचा पुन्हा एकत्र ढीग करून ठेवण्यात यावा.

– साधारणतः साडेचार महिन्यांनी पाचट कुजते आणि पाचट कुजले आहे हे ओळखण्यासाठी ते हातात घेऊन चोळले तर त्याचा सहज भुगा होतो.

– तयार झालेले खत पाच मिमी छिद्रे असणाऱ्या चाळणीने चाळून मोठ्या प्लास्टिक पिशव्यात भरून ठेवण्यात यावी गरजेप्रमाणे रोपवाटिकेतील पिशव्या किंवा कुंड्या भरण्यासाठी वापरावे. पीट तयार करण्यासाठी उसाचे पाचट वापरण्याचा फायदा पर्यायी पीट निर्माण करण्यासाठी उसाचे पाचट वापरण्याचा फायदा असा की त्याच्या पेशीभित्तीमध्ये लिग्निन व सिलिका हे दोन पदार्थ असल्याने कुजल्यानंतरही त्यांची पेशीकायुक्त रचना कायम राहते. त्यामुळे कमी वजन, पाणी शोषून घेणे व ते वनस्पतींना हळूहळू गरजेप्रमाणे उपलब्ध करून देणे आणि  हे पीट चे सर्व गुणधर्म या खतात ही आढळतात.

हे हि वाचा : ‘या’ तारखेपासून मान्सून परत जाण्याची शक्यता

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment