Monsoon Update : ‘या’ तारखेपासून मान्सून परत जाण्याची शक्यता 2022 - डिजिटल शेतकरी

Monsoon Update : ‘या’ तारखेपासून मान्सून परत जाण्याची शक्यता 2022

मुंबई : राज्यात उष्मा आणि (Monsoon) उष्णतेच्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि  त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरणामुळे काल दिवसभर पाऊस सुरूच होता तसेच आज हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.

डिजिटल शेतकरी

समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर उत्तर पंजाब आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ वाऱ्याची(Monsoon) स्थिती आहे आणि  या प्रणालीपासून बिहारपर्यंत पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला  आहे. समुद्रसपाटीपासून 4.5 किमी उंचीवर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती कायम राहणार आहे. दरम्यान, 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता वर्तविली आहे.

तसेच मान्सूनने(Monsoon) वायव्य भारतातून आपला प्रवास सुरू केला असून राजस्थानच्या (Monsoon)खाजुवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया येथून मान्सून परतला आहे आणि  परतीच्या प्रवासात काही हालचाल झाली नाही, मात्र काल मान्सून परतीची सीमा होती. येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता वर्तविली आहे.

हे हि वाचा : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण होणार? पाम तेलाचे दर वर्षातील नीचांकी पातळीवर!

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “Monsoon Update : ‘या’ तारखेपासून मान्सून परत जाण्याची शक्यता 2022”

Leave a Comment