Insurance: चिंताच मिटली! आता स्वत:च्या घरातच सुरक्षित ठेवा दागिने, बँक लॉकरची नाही गरज 2022 - डिजिटल शेतकरी

 Insurance: चिंताच मिटली! आता स्वत:च्या घरातच सुरक्षित ठेवा दागिने, बँक लॉकरची नाही गरज 2022

Insurance : जर तुमच्याकडं मौल्यवान सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असतील आणि ते तुम्ही घरात ठेवले असतील, तर तुमचे दागिने सुरक्षित आहेत की नाही अशी भीती नेहमीच सगळ्यांना पडत असते. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही बँक लॉकर निवडत असतात. कारण घरात ठेवलेले दागिने चोरीला जाऊ नयेत म्हणून तुम्हाला सतत भीती वाटत असते. बँक लॉकरमध्ये दागिने ठेवणं प्रत्येकासाठी सोपं नाही. दागिने घरी ठेवण्याची प्रथा अजूनही अनेक भागात आहे तसेच दागिने घरात ठेवल्यानं चोरीची शक्यता वाढत असते. मग दागिने घरात ठेवण्यासाठी काय करावं जेणेकरून तुमचे दागिने सुरक्षित( Insurance) राहतील किवा राहणार आहेत?

आता तुम्ही लॉकर न घेता तुमचे दागिने घरी सुरक्षित ठेवू शकत आहात. सरकाने तुम्चासाठी खास तुम्ही दागिन्यांचे विमा कवच घेऊ शकता जेणेकरून दागिने चोरीला जाणे, घरातून गायब होणे अशा वेळी तुम्हाला आर्थिक नुकसानीची चिंता / भीती  करावी लागणार नाही. विमा कंपन्या दागिन्यांच्या संरक्षणासाठी दोन प्रकारच्या पॉलिसी देत असतात. एक स्टँडअलोन ज्वेलरी पॉलिसी आणि दुसरी होम इन्शुरन्स पॉलिसी( Insurance) आणि  होम इन्शुरन्स पॉलिसींना स्वतःच्या मर्यादा आहेत.

जर तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण घेत असाल, तर चोरी झाल्यास दागिन्यांची संपूर्ण किंमत उपलब्ध नसते म्हणून  दागिन्यांच्या संपूर्ण संरक्षणासाठी तुम्ही नेहमी स्टँडअलोन ज्वेलरी पॉलिसी घेतली पाहिजे. ही पॉलिसी दागिन्यांसाठी संपूर्ण विमा संरक्षण प्रदान करत असते. ज्वेलरी इन्शुरन्स ( Insurance)पॉलिसी घेण्यापूर्वी दागिन्यांचे बाजारमूल्यांकन करून घ्या तसेच तुम्हाला ते जवळपासच्या कोणत्याही अधिकृत दागिन्यांच्या दुकानातून करता येईल. अन्यथा विमा दावा करताना विमा कंपनी तुमच्या दागिन्यांचे मूल्यांकन कमी करू शकते, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं आहे.

loans

विम्याचा प्रीमियम काय असू शकतो?

दागिन्यांच्या विम्याचा हप्ता फारसा महाग नाही आणि विमा कंपन्या दागिन्यांच्या विम्यासाठी 1 लाख रुपयांच्या विमा रकमेवर 1,000 रुपये प्रीमियम आकारत असतात. म्हणजेच, जर तुमच्याकडे 10 लाख रुपयांचे दागिने असतील तर तुम्हाला वार्षिक 10,000 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. तुम्ही एकाच वेळी इतर वस्तूंचे कव्हर घेतल्यास विमा कंपनी प्रीमियममध्ये सूट देखील देत असते.

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या-

दागिन्यांसाठी पॉलिसी घेण्यापूर्वी त्याचे परताव्याचे नियम नीट वाचून घावे. विमा कंपनीची परतावा पॉलिसी काय आहे? दागिने गहाळ झाल्यास क्लेम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रक्रियेचं पालन करावं लागेल याची माहितीअसणे आवश्क आहे. त्यानंतरच पॉलिसी( Insurance) घेण्याचा निर्णय घ्या आणि  ज्वेलरी पॉलिसीमध्ये आग आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई दिली जात असते. म्हणून सर्वप्रथम, तुम्हाला पॉलिसीचे नियम चांगले माहित असले पाहिजेत त्यानंतरच पॉलिसी हि कोणत्या कंपनी ची घ्यायची हि तुमचा वर अवलंबून असते सगळी माहिती घेऊनच पोलीसी घ्या.

हे हि वाचा : बापरे सोने झाले 1500 रुपयांनी स्वस्त, वाचा सोने-चांदीचे आजचे दर..

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment