Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, मोदी सरकारनं मोफत रेशनसंदर्भात केली मोठी घोषणा 2022 - डिजिटल शेतकरी

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, मोदी सरकारनं मोफत रेशनसंदर्भात केली मोठी घोषणा 2022

रेशन कार्डधार (Ration Card) कांसाठी मोदी सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे काय आहे बातमी पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकांना(Ration Card) डिसेंबरपर्यंत मोफत रेशनचा लाभ हा गरिबाना मिळणार आहे.

हे हि वाचा : 🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

एप्रिल 2020 मध्ये सुरू झाली होती योजना –

केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात ही योजना  सुरू केली होती आणि  नंतर मार्च 2022 मध्ये ती सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. आता सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत हिची मुदत वाढविली गेली आहे. तसेच, काही माध्यमांत ही योजना सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Ration Card

80 कोटी लोकांना होणार फायदा –

सरकारच्या या घोषणेनंतर थेट 80 कोटी लोकांना याचा फायदा  होणार असल्याचे सागिंतले जात आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना आणखी पुढे वाढविण्यासंदर्भात संकेत दिले गेले होते. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना मानली जात आहे.

3.40 लाख कोटी खर्च –

सरकारच्या या योजनेवर आतापर्यंत एकूण 3.40 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील सर्वच गरीब रेशन कार्डधारक (Ration Card)कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जात असते आहे.

हे हि वाचा : Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, मोदी सरकारनं मोफत रेशनसंदर्भात केली मोठी घोषणा 2022”

Leave a Comment