भारताबरोबरच सध्या अमेरिकेतही कापसाचा नवा हंगाम (America Cotton Season) सुरु झाला आहे. मागील महिन्यात अमेरिकेच्या कृषी विभाग (United States Department Of Agriculture) अर्थात युएसडीएनं अमेरिकेतील कापूस उत्पादन (Cotton Production) वाढेल, असा अंदाज जाहीर केला गेला होता. त्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसत आहे. अमेरिकेतील महत्वाचं कापूस उत्पादक राज्य टेक्सास आहे आणि यंदा येथील कापूस उत्पादनात मोठी घट येईल, असा अंदाज अनेक संस्था आणि जाणकार व्यक्त करत आहेत. टेक्साससोबतच इतरही राज्यांमध्ये पिकाचं नुकसान होत आहे. जाणकारांच्या मते युएसडीए ऑक्टोबरच्या अहवालात अमेरिकेतील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करू शकते आहे.
हे हि वाचा : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार
ही शक्यता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे सुधारलेले दिसत आहेत. मागील आठवड्यात डिसेंबरचे कापसाचे वायदे ८४ ते ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होत आहे. ते आज ८७.३७ सेंटवर पोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्यानं देशातील दरालाही आधार मिळत आहे. देशातील बाजारात कापसाची आवक सध्या वाढत आहे. दिवाळीनंतर आवकेत मोठी वाढ होईल आणि या काळात कापसाचे दर टिकून राहण्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामुळं मदत होणार आहे. सध्या देशात कापसाला (Cotton) प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजार रुपये दर मिळत आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजाराची स्थिती पाहता यंदा कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केल जात आहे.

1 thought on “Cotton: अमेरिकेत कापूस दर वाढले भारत हि असे राहू शकतात दर 2022”