पुणेः पाकिस्तानमधील कापूस उत्पादन (Pakistan Cotton Production) यंदा पुरामुळं घटल (Cotton Rate )आहे.
तसचं पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक (Pakistan Market Cotton Import) यंदा मोठ्या प्रमाणात घटली गेली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) नरमल्यानं बांगलादेशच्या कापडाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील कापड उद्योगाकडे (Textile Industry) मागणी येऊ लागली आणि त्यामुळं हे दोन्ही देशांकडून भारतीय कापसाला मागणी (Cotton Demand) वाढू शकते.
भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश हे मोठे कापूस वापरकर्ते देश आहेत तसचं हे देश आयातीवर अवलंबून असतात. त्यामुळं या देशांतील कापूस तुटवड्याचा भारताला प्रत्यक्ष, अप्रत्य फायदा होत असतो(Cotton Rate ) तसेच यंदा पाकिस्तानला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. यात कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आणि पाकिस्तानमधील सिंध, पंजाब आणि बलोचिस्तान मधील कापूस पीक पुरामध्ये उद्ध्वस्त झालं.
येथील कापड उद्योगाच्या मते यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्कता आहे. त्याचं प्रतिबिंब सध्या बाजारात जाणवतंय आणि मागील दशकातील कापूस उत्पादन कमी राहण्याचं हे दुसरं वर्ष आहे. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक कापूस उत्पादन सात वर्षांपुर्वी १५० लाख गाठींचं झालं(Cotton Rate )होतं. मात्र यंदा पाकिस्तानमध्ये लागवडही उद्दीष्टापेक्षा कमी झाली होती. त्यातच माॅन्सूननं कापूस पिकाला मोठा फटका दिला आहे.
Cotton Rate जून ते १ ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक जवळपास २४ टक्क्यांनी घटली गेली. मागीलवर्षी या काळातील कापूस आवक ३८ लाख ४६ हजार गाठीपर्यंत पोचली होती मात्र यंदा २९ लाख ३६ हजार गाठींवरच आवक स्थिरावली. एका कापूस गाठ १७० किलो रुईची असते आणि यापैकी जवळपास २३ लाख गाठी कापूस कापड उद्योगाने विकत घेतला तर ५ हजार (Cotton Rate )गाठींची निर्यात झाली आहे. पाकिस्तानला (Cotton Rate )यंदा जास्त कापूस आयात करावी लागणार आहे तसेच अमेरिका हा पाकिस्तानाला कापूस पुरवठा करणारा महत्वाचा स्त्रोत असतो. मात्र यंदा अमेरिकाही उत्पादन घटीला तोंड देते आहे. त्यामुळं पाकिस्तानला भारत किंवा इतर देशांकडून कापूस घ्यावा लागलं आहे.

बांगलादेशमधील कापड उद्योग सध्या कमी मागणीमुळं आडचणीत आला आहे. जागतिक बाजातून कपड्यांना कमी उठाव मिळाला आणि त्यामुळं उद्योगांकडे साठा पडून आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कपड्यांना कमी उठाव आणि मजबूत होणारा डाॅलर, यामुळं कापसाचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर एक महिन्यापुर्वी १०५ ते १०६ सेंट प्रतिपाऊंडवर होते आणि ते आता ८४ ते ८५ सेंटपर्यंत नरमले. परिणामी कापडाचेही दर नरमले. आणि या परिस्थितीत कापडाला उठाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र बांगलादेशमधील कापड उद्योग आणि सूतगिरण्यांकडे तयार मालाचा मोठा साठा पडून आहे तसेच त्यामुळं कापसाचे दर कमी झाले तरी सुतगिरण्या आणि कापड उद्योगाकडून लागेच मागणी वाढलेली नाही. पण उद्योग पुढील काही काळात पुर्वपदावर येण्याची शक्यता वर्तविली आहे. बांगलादेशमधून कापसाला मागणी वाढल्यास भारतातून निर्यात वाढेल आणि बांगलादेश नेहमी भारतातून कापूस आयात करत असतो.
पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उद्योगाकडून मागणी वाढल्यास यंदा भारताला जास्त फायदा होणार आहे. भारतातील कापूस उत्पादन उद्योगांच्या मते यंदा वाढणार आहे मात्र तर शेतकरी उत्पादनात घट आल्याचं सांगतात. उद्योगाच्या अंदाजाप्रमाणं उत्पादन वाढलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात (Cotton Rate )मागणी राहण्याची शक्यता आहे तसेच त्यामुळं देशातील कापूस दर मजबूत स्थितीत राहतील.
सध्या कापूस बाजारात चढ-उतार सुरु असले तरी शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो, असं जाणकार सांगत आहे.
हे हि वाचा : केशर आंबा लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती
तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा
3 thoughts on “Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार 2022”