लम्पी (Lumpy) आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या भरपाईपाेटीच्या निकषात राज्य सरकारने बदल केले गेले आहे. सातबारा उतारा, कमाल तीन मृत जनावरांची अट सरकारने रद्द केली आहे आणि त्यामुळं आता सरसकट मृत जनावरांच्या पशुपालकांना भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
१ काेटी १३ लाख लसीकरण
राज्याभरात आत्तापर्यंत एक काेटी १३ लाख १४ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तसेच राज्यात आजमितीला २५२८ जनावरांचा मृत्यू झाला आहे हा आकड्यात वाढ देखील झालीली आसू शकते. आणि राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील २२३८ गावांमध्ये लम्पी आजाराची बाधा झाली आहे आणि बाधित गावांतील ५९ हजार ८६५ बाधित जनावरांपैकी ३१ हजार ७९ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू केले आहेत.
माेठ्या शेतकऱ्यांनाही मदत
अकोला, जळगाव, कोल्हापूर, सांगली, वाशी, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आणि यापूर्वी लम्पी आजाराने मृत्यू झाला की अल्पभूधारकांनाच भरपाई मिळत हाेती. आता माेठ्या शेतकऱ्यांनाही(Lumpy) मदत देखील मिळणार आहे.
1 thought on “Lumpy: आता मृत जनावरांची भरपाई सरसकट 2022”