Crop Damage: बाजरी, सोयाबीन पिके धोक्यात 2022 - डिजिटल शेतकरी

Crop Damage: बाजरी, सोयाबीन पिके धोक्यात 2022

महाराष्ट्र अनेक जिल्हामध्ये पाऊस हा दुमाकुळ (Crop Damage) घालत आहे, अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. अनेक पिके हे पाण्या खाली गेलीली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला माल हा वाया गेला आहे. अजून हि काही जिल्हाना पिक विमा मिळालेला नही शेतकरी वाट पाहत आहे. सरकारने या कडे लक्ष घालवे आणि नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी.

पुणे परतीच्या पावसाने जिल्‍ह्यात (Heavy Rainfall Pune) चांगलाच धुमाकूळ घातला आहे आणि अनेक भागांत पावसाने ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या(Crop Damage) पावसामुळे मका, बाजरी, सोयाबीन (Soybean Crop Damage), ऊस या पिकांसह फळबागा प्रचंड अडचणीत (Orchard In Crisis) आल्या आहेत.

सोमवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेलीतील कोथरूड येथे ११.८, थेऊर १३.८, उरुळीकांचन १९.५, हडपसर येथे १५.८ मिलिमीटर पाऊस पडला आहे तर, खेड, खडकवासला, भोसरी, चिंचवड, कळस, पुणे वेधशाळा, केशवनगर, वाघोली भागांत हलक्या सरी बरसल्या आहेत.

मुळशीतील पौड १२.३, घोटावडे १२.३, तर थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट भागांत तुरळक सरी बरसल्या. भोरमधील भोर ३०.३, भोलावडे १३.५, नसरापूर १८.३, किकवी २१.५, आंबवडे १७.०, संगमनेर २३.३, निगुडघर येथे १७ मिलिमीटर पाऊस पडला आणि मावळमधील खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे हलका पाऊस कोसळला.

सध्या बाजरी आणि मका काढणीस तयार झाले असतानाच पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर उभ्या बाजरीला कोंब येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उसाच्या पिकात पाणी साचून राहत असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

हे हि वाचा : आता मृत जनावरांची भरपाई सरसकट

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment