Onion: रब्बी कांदा उत्पादन वाढीची सूत्रे 2022 - डिजिटल शेतकरी

Onion: रब्बी कांदा उत्पादन वाढीची सूत्रे 2022

लागवड क्षेत्र

Onion: राज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होत असते. या हंगामाचे उत्पादन तसेच कांद्याची साठवण क्षमता उत्कृष्ट असते आणि या कांद्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.

रब्बी हंगामात कांदा (Onion ) लागवडीसाठी “एन-2-4-1′ ही जात निवडावी आणि ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी (350-450 क्विं/हे.) तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी (6-8 महिने) चांगली असते. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक असते. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावाने ओळखत असतात. शेतकरी स्वतःच या जातीचे बीजोत्पादन करत असतात.

व्यवस्थापनाची सूत्रे

1) नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दर्जेदार रोपांची लागवड करावी आणि लागवड 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी.

2) लागवड करताना उत्तम निचऱ्याची, मध्यम(Onion ) खोल जमिनीची निवड करावी तसेच विशेषतः सपाट वाफ्यात रोपांची कोरड्यात 15×10 सें.मी. अंतरावर दाट लागवड करण्यात यावी. त्यानंतर हळवेपणाने पाणी द्यावे आणि  त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरवण्यात यावी.

3) लागवडीनंतर एक आठवड्यानंतर शिफारशीत तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्रखताचा वर हप्ता देण्यात यावा.

4) लागवडीनंतर 10, 25, 40 व 52  दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या देण्यात यावी.

5) लागवडीनंतर 55 दिवसांपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे आणि लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे.

6) लागवडीनंतर 110-११५  दिवसांनंतर या जातीची पात नैसर्गिकपणे पडावयास सुरवात होते. कांद्याच्या माना 50 टक्के नैसर्गिकरीत्या पडल्यानंतर कांद्याची काढणी करून घ्यावी. कांद्याची पात न कापता, पातीसकट कांदा वाफ्यात अशा रीतीने पसरवून ठेवावा की एका कांद्याचा गोट दुसऱ्या कांद्याच्या(Onion ) पातीने झाकला जाईल आणि कांद्याची पात शेतामध्ये 3 ते 5 दिवसांकरिता वाळवावी आणि  त्यानंतर वाळलेली कांद्याची पात गोटापासून एक इंच अंतराची मान ठेवून पिळा देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा छपराच्या सावलीत तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी पातळ थरात (1-2 फूट) वाळवावा आणि या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून, सडलेले व मोड आलेले कांदे निवडून फेकून देण्यात यावे.

7) साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत तसेच कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करण्यात यावी.

8) साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण फारच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही आणि साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्‍यक असते. योग्य काळजी घेऊन कांदा(Onion ) साठविल्यास हा कांदा 6 ते 8 महिने उत्तम टिकत असतो.

बीजोत्पादन करताना …

1) 15 नोव्हेंबरपर्यंत अजिबात मोड न आलेल्या कांद्याचे गोट निवडून, लाल कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रापासून सुरक्षित विलगीकरण अंतरावर (साधारण 1.5 कि. मी. दूर) घ्यावे तसेच जेणेकरून कांद्याची जैविक शुद्धता कायम राखली जाईल.

2) साधारण दर तीन वर्षांनंतर कांद्याची उत्पादकता, विकृतीची प्रतिकार क्षमता तसेच साठवणूक क्षमतेने घट झाल्यास कृषी विद्यापीठातून चागल्या या जातीचे मूलभूत बियाणे घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे.

अ) कांदा उत्पादनातील समस्या

कमी उत्पादकता –

1) रोपांची लागवड ओल्यात व दीर्घ अंतरावर केली जात असते. रोपांची लागवड उशिरा (15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत) होते. लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांदरम्यान ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो.

2) कांदा(Onion ) पोसण्याच्या काळात (लागवडीनंतर 60 ते 90 दिवस) नियमितपणे 8-10 दिवसांदरम्यान पाणी दिले जात नसते. पाण्याचा ताण बसल्यानंतर एकदम भरपूर पाणी दिले जाते तसेच फेब्रुवारी-मार्च दरम्यान शीत लहरीमुळे मोठ्या प्रमाणावर डेंगळे येत असतात.

अल्प दर्जाचे उत्पादन व साठवणूक क्षमता

1) निचरा न होणाऱ्या भारी जमिनीत लागवड, असंतुलित रासायनिक खतांचा वापर, भरखते देताना नत्रखतांचा अतिप्रमाणात वापर, लागवडीनंतर 60-65  दिवसांच्या नंतर कांदा पोसण्याच्या कालावधीत नत्र खतांचा वापर, कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी न तोडणे, कांदा (Onion )काढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून ढीग लावून कांदे वाळविणे आवश्क.

Onion

2) सावलीत तीन आठवडे कांदे न वाळविता, प्रतवारी न करता, उष्ण व दमट कांदे साठवणगृहात भरणे, कांदा साठवणगृह कांदे भरण्याआधी व भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी न करणे, साठवणगृहाची रुंदी 4 फुटांपेक्षा तर उंची 5 फुटांपेक्षा जास्त ठेवणे आवशकता असते. साठवणगृहाच्या छपरांची उंची साठवलेल्या कांद्यापेक्षा तीन फुटांपेक्षा कमी अंतरावर असणे तसेच साठवणगृह उंच जागेवर नसणे व त्याचा पाया सिमेंटच्या अथवा कडक जमिनीवर नसणे, साठवण गृहाच्या कप्प्याची उंची जमिनीपासून दोन फूट नसल्यामुळे, तळाला हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसणे.

हे हि वाचा : नाशिकच्या कल्याणीचे संशोधन ठरतेय कांदा उत्पादकांसाठी वरदान, कांदा सडतोय सांगणारे शोधले उपकरण 

कांदा शेतीमधील आव्हाने

कांदा हे वातावरणास संवेदनशील पीक असल्याने, हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो.

  1. वाढीव तापमान, पाणीटंचाई, गारपीट व वादळी पाऊस यांच्यापासून बचाव करून जास्त उत्पादन घेण्यासाठी, रब्बी हंगामात कांद्याची लागवड तसेच बीजोत्पादनासाठी गोट लागवड 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतच पूर्ण करण्यात यावी.
  2. हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी लवकर तयार होणारी आणि कमी कालावधीची रब्बी कांद्याची जात (90-100 दिवस) तयार करावी लागणार आहे.
  3. राज्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र लक्षणीयरित्या कमी झालेले दिसत आहे. पूर्व हंगामी उसाच्या पट्टा पद्धतीत पांढऱ्या कांद्याचे रांगडा हंगामात उत्पादन झाल्यास, कांद्याचे निर्जलीकरणाचे प्रक्रिया केंद्रे विकसित करणे शक्‍य होत आहे. त्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला “फुले सफेद’ ही जात योग्य मानली जात आहे. मात्र रब्बी हंगामातील उसाचे व कांद्याचे योग्य पीक नियोजन करणे अत्यावश्‍यक असते.
  4. सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक किंपर सूक्ष्म तुषार) वापर करावा आणि सुधारित कांदा चाळीचा वापर करावा.

हे हि वाचा : कांदा साठवणुकीतील रोग व त्यांचे व्यवस्थापन

लागवड क्षेत्र

1) कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत.

2) देशाचे 25 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात आहे. नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील 37 टक्के, तर देशातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होत असते.

3) कांदा(Onion ) उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रतिहेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागत आहे.

4) भारतात खरीप हंगामातील उत्पादकता प्रतिहेक्‍टरी 8 टन आहे, तर रब्बी(Onion ) हंगामाची उत्पादकता प्रतिहेक्‍टर 16 टन एवढे आहे.

onion

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment