BCCI:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदी माजी खेळाडू राॅजर बिन्नी यांची निवड झाली. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी बिन्नी यांची निवड करण्यात आली.
‘बीसीसीआय’ अध्यक्षपदासाठी बिन्नी यांचे एकट्याचे नामांकन होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार, हे निश्चित मानले जात होते.
मुंबईत आज ‘बीसीसीआय’BCCIची वार्षिक सभा झाली. त्यात बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘बीसीसीआय’च्या निवड समितीत रॉजर बिन्नी यांनी आधी काम केले आहे.
भारताने पहिल्यांदाBCCI 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला, त्या विजेत्या संघात रॉजर बिन्नी यांचा समावेश होता. आता त्यांच्यावर ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे.
‘बीसीसीआय’च्या खजिनदारपदी मुंबई भाजपचेBCCI अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची नियुक्ती झाली. जून 2015 मध्ये आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनवर निवडून गेले होते. 2017 मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले.