कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन(Bollworm on Cotton) 2022 - डिजिटल शेतकरी

कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन(Bollworm on Cotton) 2022

Bollworm on Cotton: महाराष्ट्राध्ये साधारणतः राज्यातील प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागात कापूस हे महत्वाचे नगदी पीक असते. कपाशीवर बोंडअळया, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत असतो. बोंडअळयांच्या व्यवस्थापनासाठी सन २००२ मध्ये बी. टी. जनुक (Bollworm on Cotton)असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरू झाला आहे.

सुरुवातीच्या काळात या वाणांवर अलिकडील काही वर्षांमध्ये बी. टी. जनुक असलेल्या वाणांवर या हिरव्या बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली दिसून येत असते. तसेच सध्या शेदरी (गुलाबी) बोंडअळींचा देखील बी. टी. जनुक असलेल्या वाणांवर कारणे, ओळख, नुकसानीचा प्रकार व एकात्मिक(Bollworm on Cotton) व्यवस्थापनाच्या बाबी समजावून घेणे आवश्यक ठरत असते. वेळीच योग्य व्यवस्थापनाची खबरदारी घेतल्यास आपण शेंदरी बोंडअळीपासून होणा-या नुकसानीपासून आपले बहुमूल्य पीक वाचवू शकत आहे.

जीवनक्रम व ओळख

  • अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी(Bollworm on Cotton) असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येत असते.
  • अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्र झालेल्या अड्यांतून सफेद रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़त असते.
  • पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरत असतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसत असते,
  • अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान आढळत असते.
  • कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येत असतात.
  • पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसत असतात आणि पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात(Bollworm on Cotton) व पाठीमागील पंख पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहत असते.

cotton

नुकसानीचा प्रकार

  1. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारिक कणाच्या सहाय्याने छिद्र बंद करत असते. ज्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नसतो.
  2. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असते.
  3. किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे(Bollworm on Cotton) परिपक न होताच फुटत असतात.
  4. शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीचेही नुकसान करते आणि सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होत असते.

आर्थिक नुकसान पातळी

फेरोमोन सापळ्यामध्ये सरासरी आठ ते दहा नर पतंग सतत २ ते ३ दिवस आढळून येणे अथवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येत असणे.

हे हि वाचा : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन

व्यवस्थापन

  1. स्वच्छता मोहीम आणि मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल (Bollworm on Cotton)नांगरणी करण्यात यावी.
  2. कपाशीच्या सभोवती नॉन बीटी रेफ्युजी आश्रीत कपाशीची लागवड करावी आणि तसेच मका, चवळी, झेंडू व एरंडी या मिश्र सापळापिकांची एक कपाशीमध्ये अळ्या खाणा-या पक्षांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्रपिक घ्यावे आणि त्यासाठी हेक्टरी २५o ग्रॅम बियाणे वापरण्यात यावे.
  3. कपाशीच्या कुळातील (भंडी, अंबाडी) ज्या पीकावर शेंदरी बोंडअळी उपजिवीका करते अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नका.
  4. मृद परिक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा आणि शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळण्यात यावा.
  5. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मिश्रपिके कपाशी पिकाभोवती घेण्यात यावी.
  6. कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे उभे करावेत म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खात असतात.
  7. बोंडअळीग्रस्त डोमकळया तोडून आतील अळीसहीत(Bollworm on Cotton) नष्ट करण्यात याव्या.
  8. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम १ मि.लि. प्रति लिटर किंवा १५00 पीपीएम २.५ मि.लि. प्रति लिटर फवारणी करण्यात यावी,
  9. प्रत्येकी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन सापळे लावावेत म्हणजे दोन फेरोमोन सापळ्यामधील अंतर ५0 मीटर ठेवावे. सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्यावेळी नष्ट करण्यात यावे.
  10. लकॅनी १.६  टक्के विद्राव्य घटक असलेली भुकटी (२.५ किलो प्रती हेक्टर) ४०-४५  ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आर्द्रता असताना फवारनि करावी.
  11. पीक उगवल्यानंतर ११५ दिवसांनी ट्रायकोग्रॅमाटाँडीया बॅक्ट्री अथवा ट्रायकग्रामा विलीनीस या परोपजीवी किटकाची १.६  लक्ष अंडी प्रती  हेक्टर या प्रमाणात प्रसारण करावीत.
  12. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढील किटकनाशकांची फवारणी करण्यात यावी.
हे हि वाचा : चीनच्या स्वस्त सुताची कापूस उत्पादकांना धास्ती? चीनमधून सूत आयात आयात थांबविण्याची मागणी

कीटकनाशक     प्रमाण/ ली. पाणी

क्वीनालफॉस २५ ईसी    २ मी.ली.

प्रोफेनोफॉस ५० इसी     २ मी.ली.

थायोडीकार्ब ७५ डब्लूपी   २ मी.ली.

लॅमडा साहॅलोथ्रीन ५ इसी २ मी.ली.

कीटकनाशक प्रमाण / लि. पाणी क्रिनालफॉस २५ ईसी २ मि.ली. प्रोफेनोफॉस ५o ईसी २ मि.ली. थायोडीकार्ब ७५ डब्लुपी २ मि.ली. लॅमडा साहॅलोश्रीन ५ ईसी २ मि.ली.

अशाप्रकारे कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे(Bollworm on Cotton) व्यवस्थापन करून शेतक-यांसाठी आपले बहुमुल्य पीक वाचवण्यात यावे.

Cotton

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

3 thoughts on “कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन(Bollworm on Cotton) 2022”

Leave a Comment