health: थंडीच्या दिवसात गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास जास्त जाणवत असल्याचं दिसून येतं आहे. या आजारांपासून लांब राहण्यासाठी तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. वाढत्या वयाबरोबर लोकांना सांधेदुखीचा त्रास होऊ लागत आहे. हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णांचा त्रास वाढतो आणि थंडीमुळे हाडे आणि ( health ) गुडघे दुखू लागत असतात. वास्तविक, हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते आणि याला इंग्रजीत आर्थरायटिस म्हणतात.(Joint pain relief home remedies for arthritis garlic fenugreek seeds and coriander seed herb for arthritis)
तज्ज्ञांच्या मते, भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरूणांनाही ( health ) सांधेदुखीचा त्रास होतना दिसत आहे. त्यामुळे चालणे सर्वात कठीण होत आहे. मात्र, घरगुती उपायांनी सांधेदुखी बऱ्यापैकी बरी होऊ शकते जाणून घेऊया हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात.
लसूण
हिवाळ्यात लसणाचा आहारात नक्कीच समावेश करा आणि लसूण खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळत असतो. लसणात सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळत असतात. जे लोक रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या २-३ पाकळ्या खातात, त्यांना सांधेदुखीच्या समस्येत खूप आराम मिळत असतो.
सांधेदुखी
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मेथीचे सेवन करणे ( health )फार आवश्यक आहे. मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळत असतात. हे सांधेदुखीविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि मेथीमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आढळत असतात, ज्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळत आहे. सांधेदुखीच्या रुग्णाने 2 चमचे मेथी पाण्यात उकळून पाणी प्यावे तुम्ही ते रिकाम्या पोटी चहासारखे पिले पाहिजे.
धणे
संधिवात दुखण्यात भरपूर अँटीऑक्सिडंट घटक आढळतात आणि यामुळे सांधेदुखीत आराम मिळतो. सांधेदुखीसाठी धणे खूप फायदेशीर आहे तसेच सांधेदुखीच्या रुग्णांनी पाण्यात भिजवलेले धणे प्यावे. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्यात धने पावडर टाकून पिऊ शकता आणि याच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम मिळेल.

१) ( health )सांधेदुखीच्या रुग्णाने आहारात अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करावा लागतो.
२) मोसंबी आणि हंगामी फळे खाल्ल्याने सांधेदुखीत आराम मिळत असतो.
३) सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी दूध आणि दह्याचेही सेवन करावे लागते.
४) जेवणात म्लटीग्रेन चपाती खाल्ल्यानेही फायदा होत असतो.
५) मोड आलेली कडधान्य खायला पाहिजे.
1 thought on “health: थंडीत कंबर, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? रोज 5 पदार्थ खा, तब्येत राहील ठणठणीत”