Tomato Rate: टोमॅटोचे दर का घसरले?2022 - डिजिटल शेतकरी

Tomato Rate: टोमॅटोचे दर का घसरले?2022

Tomato Rate: प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना (Tomato Farmer) चांगल्या बाजाराने दोन महिन्यांपर्यंत दिलासा दिला आहे. खर्च निघून येईल, अशी आशा मनात असतानाच दिवाळीनंतर मार्केट डाउन झाले होते. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगळुरूचा टोमॅटो हंगाम (Tomato Season) या वर्षी नेमका आताच सुरू झाला आहे आणि देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार, निर्यातदार कर्नाटककडे वळले असल्यानेही उतरण झाली आहे. तरी टोमॅटोचे सध्याचे दर स्थिर राहतील, अशी स्थिती सद्य आहे.

मागील काही वर्षे तेजीचे मिळाल्यामुळे यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह पाहायला मिळत होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपरिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले गेले होते. त्यामुळे टोमॅटो लागवड अर्थातच वाढलेली होती आणि यंदाच्या जोरदार पावसाने Tomato Rate त्यातही चित्रा नक्षत्रातील परतीच्या पावसाच्या तडाख्याने उत्साहाची हवा बरीच कमी केली.

या काळात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाचे रान केले आणि औषधे, खते, मजुरी यासाठीचा खर्च यंदा दीड ते दोन पटीपर्यंत वाढला होता. त्यातही काही वाणांनी मोठाच दगा दिला तसेच बरेच प्लॉट मर, सुकवा या रोगांना बळी पडले. आणि याही परिस्थितीतून वाचलेल्या टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेट ५०० ते ८०० रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता.Tomato Rate

मागील पाच दिवसांपासून या तेजीलाही ग्रहण लागले आहे आणि टोमॅटोचे दर प्रति क्रेट कमाल ८०० वरून ४०० पर्यंत, म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत. हे दर तरी टिकून राहावेत, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे तसे झाले तरच यंदाचा झालेला भरमसाट खर्च निघून येईल.Tomato Rate

दरातील नरमाई

बंगळूरचा नुकताच सुरू झालेला हंगाम, तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापाऱ्यांकडून सांगितली जात आहेत मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील टोमॅटो उत्पादक पट्ट्याचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते.

यामुळे बंगळूर हंगाम अगोदरच आटोपला होता त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून फार मागणी होती. परिणामी, टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले आणि मागील वर्षीचा धडा घेऊन बंगळूर भागातील उत्पादकांनी लागवड उशिरा केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरुवात झाली होती.

कर्नाटक भागातील बहुतांश लाल मातीत येणारा तेथील स्थानिक टोमॅटो एक सारखा रंगात येत आहे आणि त्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. तसेच नाशिकच्या तुलनेत त्याचे दर काहीसे कमी आहेत त्यामुळे नाशिक भागातील टोमॅटोच्या खरेदीदारांनी बंगळूरकडे मोर्चा वळवला आहे.

गिरणारे भागात मागील मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून व्यापार करणारे नसीम यांच्या म्हणण्यानुसार या भागातील ८० टक्के व्यापाऱ्यांनी बंगळूरकडे गेले आहेत बंगळूर येथील टोमॅटो हा नाशिकच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपये कमी दराने मिळत असल्याने त्या टोमॅटोलाच प्राधान्य दिले आहे.

बांगलादेश हा भारतीय टोमॅटोसाठी सर्वांत महत्वाचा खरेदीदार देश राहिला आहे तसेच मागील चार-पाच वर्षांपासून दोन्ही देशांतील हा व्यापारही अडचणीत आलेला आहे. बांगलादेशने वाढविलेला ३४ टक्के आयातकर हे त्यामागील प्रमुख कारण दिसत आहे. परिणामी, टोमॅटोची निर्यात मंदावलेली आहे आणि गिरणारे, पिंपळगाव बसवंतच्या बाजारातून बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीत ७० टक्क्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात.

हे हि वाचा : थंडीत कंबर, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? रोज ५ पदार्थ खा, तब्येत राहील ठणठणीत

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Tomato Rate: टोमॅटोचे दर का घसरले?2022”

Leave a Comment