Mandous Cyclone : चक्रीवादळ आज धडकणार 2022 - डिजिटल शेतकरी

Mandous Cyclone : चक्रीवादळ आज धडकणार 2022

पुणे : बंगालचा उपसागरात गुरुवारी ‘मनडूस’ चक्रीवादळाची (Mandous Cyclone) निर्मिती झाली आहे तसेच पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेली वादळी प्रणाली आज (ता. १०) सकाळपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. आणि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळ तयार झाले आहे तसेच शुक्रवारी (ता. ९) सकाळपासून चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे.

दुपारी ही प्रणाली कारईकलपासून आग्नेयेकडे १८० किलोमीटर, तर चेन्नईपासून २६० किलोमीटर आग्नेयेकडे होत आहे. या ठिकाणी चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह, केरळ, तमिळनाडू, तेलगंणा, ओडिशा, श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडत आहे.Mandous Cyclone

महाराष्ट्रातही ढग जमा होत असून, आजपासून पावसाची शक्यता आहे शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्री ते आज (ता. १०) सकाळपर्यंत ताशी ६५ ते ८५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हे वादळ उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल आहे.

हे हि वाचा : कापसाला राज्यात किती दर मिळात आहे पहा ?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment