Management: हरभऱ्यावरील घाटे अळी व व्यवस्थापन 2022 - डिजिटल शेतकरी

Management: हरभऱ्यावरील घाटे अळी व व्यवस्थापन 2022

घाटे अळी:

Management: हि अळी हरभऱ्याप्रमाणेच कापूस, ज्वारी, मका, तूर, टमाटे आणि इतर कडधान्य पिकांवर आढळून येत असते. परंतु हरभरा हे तिचे आवडते खाद्य असल्याने तिला घाटे अळी म्हणून ओळखले जात आहे. या किडीचा जीवनकाळ अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेतून पूर्ण होतो. अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असते. पतंग मजबूत बांध्याचे, फिक्कट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक कला ठिपका असलेले असतो आणि मागील पंखाच्या कडा धुरकट असतात.

नर व मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी पतंग 3 ते 4 दिवसात पिकाच्या पानाफुलावर अथवा कोवळ्या शेंड्यावर 156 ते 300 गोलाकार चकचकीत हिरवट पिवळसर रंगाची अंडी घालतात. अंड्यातून 6 ते 8 दिवसात भुरकट पांढऱ्या अळ्या बाहेर येत असतात. सुरुवातीच्या काळात अळ्या पानांच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग आढळून येतात आणि या काळातील नुकसान चटकन लक्षात येत नाही. कळ्या व फुले लागल्यानंतर अळ्या ते खात असतात. घाटे लागल्यानंतर अळी डोक्याकडील अर्धा भाग घाट्यात खुपसून आतील दाणे खात असते. त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्रे दिसुन येतात आणि अळीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते.

हे हि वाचा : कलिंगड,काकडीवरील रोग

पूर्ण वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. एक अळी पूर्ण वाढ अवस्थेत 30 ते 40 घाटे अथवा 6 ते 8 ग्रॅम दाणे खात असते. अळीपासून पिकाचे साधारणत: 30 ते 40 टक्के नुकसान होते आणि कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळीची 1 ते 2 दिवस भूक मंदावते व अळी झाडाच्या अवती भोवती जमिनीत 5 ते 10 सेमी खोल जाऊन अंगाभोवती मातीचे वेष्टण करून त्यामध्ये कोषावस्थेत जाते.

कोष तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 सेमी लांब असतात तसेच हवामानानुसार कोषावस्था 8 ते 15 दिवसात पूर्ण होते. कोषातून परत रात्रीचे वेळी पतंग बाहेर पडतात आणि त्यांचे पुढील प्रजनन सुरु होते. अशाप्रकारे या किडीचा जीवनक्रम 30 ते 40 दिवसात पूर्ण होत आहे.Management

कीड व्यवस्थापन:

  • हरभरा पिकाचे या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात यावी.
  • हरभरा पिक एक महिन्याचे होईपर्यंत निंदणी आणि कोळपणी करून तण विरहीत ठेवण्यात यावी.
  • कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत 1-2 अळ्या आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात 8-10 फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8-10 पतंग येत असल्यास कीटकनाशाकाची फवारणी/धुरळणी करण्यात यावी.Management
  • पिक फुलोऱ्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करण्यात याव्या.
  • पेरणी बरोबर ज्वारीची दाणे मिसळली नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच इंग्रजी (T) आकाराच्या काठ्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे म्हणून रोवाव्यात.Management
  • रासायनिक कीटकनाशाकांची फवारणी/धुरळणी शक्यतो पट्टा पद्धतीने पिकाच्या 1 ते 1.5 मी. रुंद एका आड एक पट्ट्यावर करावी व राहिलेल्या पट्ट्यावर 5-7 दिवसांनी परत फवारणी करावी जेणेकरून परोपजिवी/परभक्षी किडींचे संवर्धन होऊन त्यांची कीड नियंत्रणास मदत होणार आहे.
  • घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता त्या अळीचा विषाणू (एच.ए.एन.पी.व्ही.) प्रती हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवरण्यात याव्या.

सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment