Cold Weather : जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाड्यात थंडी अधिक
पुणे : Cold Weather राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट होऊ लागल्याने थंडीची (Cold) चाहूल लागली आहे तसेच जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता अधिक असल्याने थंडी (Cold Weather) अधिक राहण्याचे संकेत आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीइतके राहण्याचा, तर कोकणात थंडी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली गेली आहे.
जानेवारी महिन्यातील किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी (ता. ३१) जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतातील भाग आणि वायव्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची शक्यता आहे तर दक्षिण भारत, ईशान्य भारतातील राज्यात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे मात्र दक्षिण भारतासह पश्चिम किनारपट्टी व लगतच्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज राहणार आहे.Cold Weather
यात गुजरातसह महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले गेले आहे. प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहणार आहे आणि ला-निना स्थिती त्यानंतर निवळत जाण्याचे संकेत आहेत. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे.