indiapost: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती - डिजिटल शेतकरी

indiapost: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती

indiapost: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट ऑफिसने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी एकूण 98083 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली गेली आहे. एकूण 98083 रिक्त पदांपैकी पोस्टमनच्या 59099 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा रिक्त आहेत अन  तर मल्टी-टास्किंग पदासाठी 23 मंडळांमध्ये एकूण 37539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता

अधिकृत इंडिया पोस्ट ऑफिस अधिसूचना 2023 मध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणांसह किंवा त्याहून अधिक उत्तीर्ण केली आहे, ते इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत तसेच, उमेदवार पात्रता निकषांसंदर्भात इतर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासून पाहू शकत आहेत.

ऑनलाइन अर्ज

indiapost: इंडिया पोस्ट ऑफिस लवकरच या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख याबद्दल अधिसूचना जारी करणार आहे आणि या भरतीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली गेली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया…

– या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट दिली पाहिजे आहे.

– आता तुम्हाला होमपेजवर ‘India Post Recruitment 2023’ ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करणे आवश्क.

– यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे ‘Register Now’ वर क्लिक करणे आहे.

– आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल आणि येथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

– रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागगणार आहे.

– सविस्तर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागणार आहे.

– फी भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घेणे आवश्क.

हे हि वाचा : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठ्याचा अंदाज|

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “indiapost: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती”

Leave a Comment