पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) वाढला आहे आणि तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत थंडी (Cold) कायम आहे. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला गेला आहे.Cold Weather
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला असला, तरी राज्याच्या किमान तापमानात चढ – उतार सुरूच आहेत तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.
रविवारी (ता. १५) धुळे Cold Weather येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तर निफाड, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली आहे आणि कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, तापमानाचा पारा २६ ते ३३ अंशांच्या आसपास आहे.
दरम्यान, पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे आणि थंडीची लाट आल्याने रविवारी (ता. १५) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Cold Weather:रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)खालीलप्रमाणे : पुणे ३१.१ (१०.७), जळगाव २७ (७.८), धुळे २६ (५.५), कोल्हापूर ३१.७ (१६),महाबळेश्वर २६.१(१३.७), नाशिक २८.३ (८.४), निफाड ३०.८ (६.३), सांगली ३१.३ (१४.९), सातारा ३३ (१२.७), सोलापूर ३३.६ (१५.६), सांताक्रूझ २६.२ (१३.८), डहाणू २४.२ (१३.१), रत्नागिरी २८ (१५.८), औरंगाबाद २८.५ (८.८),नांदेड – (१४.६), परभणी २९.२ (१३.५), अकोला ३०.५ (१३.२), अमरावती २९.४ (१३), बुलडाणा २६.२ (१२.४), ब्रह्मपुरी ३०.२ (१५), चंद्रपूर २९ (१५.८), गडचिरोली ३०.२ (१२.४), गोंदिया २९.२ (१२.८), नागपूर २९.२ (१२.८), वर्धा ३० (१३.६), वाशीम – (१२.८), यवतमाळ २९.२ (१२.५)
1 thought on “Cold Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठ्याचा अंदाज 2023”