TRAI: १ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार - डिजिटल शेतकरी

TRAI: १ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार

No More Spam Calls TRAI New Rule: आता १ मे पासून तुमच्या फोनवर नको असलेले कॉल येणे बंद होणार आहे. लोकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन ट्रायने मोबाइल कंपन्यांना कडक निर्देश दिले गेले आहेत. कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह स्पॅम फिल्टर्स बसवण्यास सांगण्यात आले आहे.TRAI

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना १ मे पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर बसवण्यास सांगितले आहे तसेच जेणेकरून लोकांना त्रास देणारे अनवॉण्डेट कॉल नेटवर्कवरच ब्लॉक केले जातील.

हे हि वाचा : कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकी देत असेल तर घाबरु नका, RBI चा नवा आदेश काय आहे वाचा

सर्वसामान्यांना होणार फायदा

ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर नेटवर्कवरच कॉल्स थांबवतील  म्हणजेच असे कॉल सामान्य लोकांच्या फोन नंबरवर पोहोचणार नाहीत. आणि याचा फायदा असा होईल की मीटिंग, हॉस्पिटल किंवा महत्त्वाच्या कामाच्या वेळी तुम्हाला त्रास देणारे अनवॉण्डेट कॉल किंवा स्पॅम कॉल्स यापुढे त्रास देऊ शकणार नाहीत. त्यापूर्वीच या कॉल्सचे कनेक्शन खंडित केले जाईल.

कंपन्यांचा असेल एक कॉमन प्लॅटफॉर्म

या सेवेसाठी कंपन्यांना कॉमन प्लॅटफॉर्म वापरावा लागणार आहे आणि देशातील विविध टेलिकॉम नेटवर्कमुळे, हे प्लॅटफॉर्म सर्व नेटवर्कवरील नको असलेले किंवा स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यात मदत करणार आहे. कंपन्यांना या प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलेल्या नंबरची माहिती द्यावी लागेल, जे लोकांना स्पॅम किंवा नको असलेले कॉल करत असतात. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना १ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १ मे नंतर अशा नंबरवरून येणारे कॉल्स फक्त नेटवर्कवर ब्लॉक करावे लागणार आहे.

बँक, आधार इत्यादींसाठी नवीन क्रमांक जारी होणार

TRAI ने असेही स्पष्ट केले आहे की बँक, आधार किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेशी संबंधित संदेश आणि कॉलसाठी नंबरची स्वतंत्र मालिका दिली जाईल आणि इतर सर्व नंबर ब्लॉक केले जातील. याचा अर्थ आता हे सर्व एसएमएस आणि कॉल्स केवळ एका विशेष सीरिज क्रमांकावरून येतील म्हणजेच हे कॉल्स पाहिल्यावर कळेल की हे अर्जंट कॉल्स किंवा एसएमएस आहेत.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “TRAI: १ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार”

  1. आपण ज्या कंपनीचे सीन वापरतो त्या कंपनीने इतर प्रायव्हेट कंपन्यांना आमचे नंबर देऊन ते नाहक त्रास देत राहतात तो त्रास पूर्ण बंद व्हावा कारण उदाहरणार्थ शेअर मार्केट वेळा कंपनीच्या ऍड वेगळ्या कंपन्यांचे मेसेज अशा प्रकारचा कोणत्याही त्रास मोबाईल धारकास होता कामा नये

    Reply

Leave a Comment