Online College Course: ऑनलाईन कोर्सचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या 2023 - डिजिटल शेतकरी

Online College Course: ऑनलाईन कोर्सचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या 2023

Online College Course: करोना काळामुळे ऑनलाईन कोर्सला फार महत्व प्राप्त झाले आहे. मुलांच्या शाळांपासून, शिकवणी वर्ग ऑनलाईन झाले आहेत तसेच ऑनलाईन कोर्स जितका फायदेशीर आहे तितका नुकसान देणारा देखील ठरु शकत आहे. पण फायदा आणि नुकसान या दोन्हीसाठी विद्यार्थी स्वत: जबाबदार ठरत आहेत. ऑनलाईन कोर्स करुन एकीकडे तुम्ही आपले स्किल्स वाढवता तर दुसरीकडे वेळखाऊ आणि आळशीपणाचे शिकार होऊ शकता तसेच ऑनलाईन कोर्समुळे होणारे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.(Online College Course)

ऑनलाईन कोर्सचे फायदे काय आहे

नेहमी उपलब्ध

ऑनलाईन शिकवणीत तुमचे शिक्षक तुम्हाला सातही दिवस २४ तास उपलब्ध असतात आणि तुम्ही त्यांच्याकडून लेक्चर मिळवू शकता, नोट्स मागू शकता, असाईनमेंट तपासू शकता, अभ्यासाचे प्रश्नोत्तरे घेऊ शकता, प्रश्नांवर चर्चा करु शकता, आपल्या सहकाऱ्यांसोबत चॅट करु शकता आणि तुमच्या वेळेप्रमाणे अभ्यासहि करु शकत आहात.

मित्रांचा सहभाग

ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, मित्रवर्ग देखील सहभागी होऊ शकत आहात. विद्यार्थी जेव्हा इंटरनेटवर काही शोधत असतात तेव्हा आईवडीलांचे लक्ष राहते तसेच आपला परिवार आणि मित्रांची मदत मिळाल्याने मुलांना यशस्वी होण्यास मदत होत असते.(Online College Course)

लवचिकता

ऑनलाईन कोर्स हा लवचिक आहे म्हणजे तुम्ही वाटेल तेव्हा अभ्यास करु शकता आणि पाहीजे त्याच्यासोबत राहून अभ्यास करु शकता. तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेसअप करु शकत आहात.

स्किल्स वाढतात

ऑनलाईन कोर्स प्रत्यक्ष जगातील स्किल्स शिकवतात आणि तुम्ही ऑनलाईन कोर्स पूर्ण कराल तेव्हा तांत्रिक कौशल्याच्या रुपात ईमेल आणि वेब ब्राऊजिंग देखील दाखवू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवणे, त्यातून शिकणे हे तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यातील संधी खुल्या करत असते. तुम्हाला ऑनलाईन नोकरी मिळू शकते, कॉलेजचे अर्ज ऑनलाईन मिळवू शकता आणि इतर अनेक कामे करु शकता.

ऑनलाईन वर्गाचे नुकसान

वेळ

ऑनलाईन क्लासमध्ये ऑफलाईन क्लासपेक्षा जास्त वेळ लागत असतो. ऑन कॅम्पसमध्ये त्यापेक्षा कमी वेळ लागतो  कारण तिथे त्याप्रमाणे वातावरण असते. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शिक्षक किंवा मित्रांना भेटून शंका निरसन करत असतात. पण इथे तुम्हाला शंका असल्यास मेसेज टाइप करुन संवाद साधावा लागत असतो. तुम्ही लिहिलेले वाचण्या किंवा ऐकण्यासाठी जास्त वेळ जात असतो.

इंटरनेट

ऑनलाईन कोर्स अधिक शिथिल असतो कारण एखादा विद्यार्थ्यालाऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यास उशीर होऊ शकतो. कारण इथे वर्गात वेळेत यायचं असं म्हणणारं नाहीय आणि असाइनमेंट वेळेत पूर्ण करा, परीक्षा जवळ आल्या आहेत असं वारंवार सांगणारे कोणी नसते. तुम्हाला कोणी उपदेश देत नाही. ऑनलाईन वातावरणात अभ्यास करुन असाइनमेंट टाळणे शक्य असते.

वेळेचे नियोजन

ऑनलाईन क्लासमध्ये शिकताना वेळेचे नियोजन असणे फार गरजेचे आहे. ही तुमच्या ऑनलाईन कोर्सची गरज आहे आणि तुम्हाला व्यक्तिगत वेळेचे कौशल्य अवगत करावे लागेल. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी स्वयंशिस्तीची गरज असते तसेच तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढावा लागेल.

Online College Course
Online College Course

वर्गाप्रमाणे संवाद नाही

ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्यासोबत कोणी नसतं आणि कॉम्प्युटर हाच तुमचा सोबती असतो. पण कॅम्पसमध्ये तुमच्या आजुबाजूला विद्यार्थी मित्र असतात. शिस्त शिकवणारे शिक्षक असतात पण ऑनलाईन कोर्समध्ये असे काही नसते.

अॅक्टीव्ह लर्नर

ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला अॅक्टीव्ह लर्नर बनावे लागेल आणि यामध्ये केवळ तुम्हीच तुमच्या शिक्षणास जबाबदार आहात. तुमच्याकडून कोणी अभ्यास करवून घेणार नाही कारण स्वप्न पूर्ण करण्याची ठिणगी तुमच्यात असायला हवी.(Online College Course)

आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात कोणतेही लोन घेयचे असेल तर आपला सिबिल स्कोर असणे आवश्क आहे

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment