Solar Powered: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विकसित केले गेले आहे. सन २०२३ च्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या यंत्राच्या शिफारशीस वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांची संरक्षण करण्याकरीता मान्यता मिळालेली गेली आहे.Solar Powered
शेतातील पीक जेव्हा अंकुर, रोप या अवस्थेत असते तेव्हा जंगली वन्यप्राणी उदा. हरीण, रानगाय, नीलगाय, रानडुक्कर इ. हे मुख्यतःवे रात्रीच्या वेळेला पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान करतात आणि ज्यामुळे शेतीमधील पिकमळाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. प्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय ठरत आहे.
सदर यंत्रामध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरी, डी. सी. मोटर, एल ई डी लाईट आणि स्पीकर यांचा समावेश गेला आहे. यंत्राच्या वरच्या बाजूला असलेले सौर पॅनल, सौर ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते, जी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवली जात असते. हि बॅटरी एल ई डी लाईट व डी. सी. मोटरला ऊर्जा पुरवते आणि ती लाईट ला १० आरपीएम वर फिरवते तसेच स्पीकर वर ५ मिनिटांच्या अंतराने १० सेकंद पर्यंत आवाज करते आणि यंत्रांतील मोटर एल ई डी लाईट ला वर्तुळाकारामध्ये फिरवते त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी उपस्थितीची जाण होते तसेच स्पीकर चा आवाज ऐकून वन्यप्राणी घाबरून दूर पळतात तसेच अशा प्रकारे हि प्रणाली शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
वैशिष्ट्ये
– सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र आहे आणि यासाठी सयंत्रातील बॅटरी हि सोलर फोटोव्होल्टिक पॅनल द्व्यारे चार्जिंग केली जाते व पर्यायाने विजेची बचत होते.
– हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित असून सूर्यास्त झाल्यावर सुरु होते व सूर्योदय झाल्यावर बंद होत असते.
– या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाहीत.
– सदर यंत्र हे विना प्राणघातक नियंत्रण तंत्र आहे जे सौर उर्जेवर चालते जे पिकांचे नुकसान टाळते किंवा कमी करते तसेच जनावरांची शेतात प्रवेश करण्याची इच्छा कमी करत असते.
– एक यंत्र हे २ हेक्टर क्षेत्रफळा पर्यंत कार्य करू शकत आहे.Solar Powered
वापर व देखरेख
– सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवण्यात यावे.
– शेतात ठेवा अगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किट वरील बटन सुरु (ऑन) करून ठेवण्यात यावे.
– यंत्राची उंची हि पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंच असावी लागते.
– धुके व ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून ६-७ तास यंत्राची बॅटरी चार्जिंग करून घ्यावी लागते.Solar Powered
डॉ. सुरेंद्र काळबांडे
अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय
सागर पाटील
इन्क्युबेशन मॅनेजर, आर आय एफ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
what is the price of this product?