नारळ बागेचे व्यवस्थापन - डिजिटल शेतकरी

नारळ बागेचे व्यवस्थापन

1) नारळाला नियमित जास्त प्रमाणात पाणी द्यावे. हिवाळ्यात प्रत्येक झाडास 30 -४०  लिटर आणि उन्हाळ्यात 40 -५०  लिटर या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी पाणी द्यावे. बुंध्यातील  गवत खुरपणी  काढून टाकावे. तसेच बुंध्यात नारळ, झावळा, पाने, पालापाचोळा अथवा गवत यांचे आच्छादन करावे म्हणजे पाणी कमी लागते.

2) नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वरून सावली करावी  साडी किवा काहीतरी बांधावे अन्यथा उन्हाचा त्रास होऊन पाने पिवळी पडण्याची शक्‍यता असते.

coconat trees

3) नवीन लागवड केलेल्या रोपांना गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा किंवा कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते म्हणून वरचेवर लक्ष ठेवून औषधे  उपाययोजना करावी.

4) कोंब कुजव्या हा रोग आढळल्यास प्रादुर्भीत भाग साफ करून त्या जागी बोर्डो मिश्रणाचा लेप द्यावा आणि त्या जागी पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

5) जानेवारी – फेब्रुवारीमध्ये नारळाला योग्य त्या खताची मात्रा द्यावी. यासाठी युरिया 750ते ८००  ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश 650-700  ग्रॅम ही खते दोन वेळा द्यावीत. खताची मात्रा कमी पडल्यास फळगळ दिसून येत असते. तसेच फळे तडकून पडत असतात. त्यासाठी योग्य प्रमाणात खत मात्रा नत्र देणे आवश्‍यक आहे.

1 thought on “नारळ बागेचे व्यवस्थापन”

Leave a Comment