पुढील 5 दिवस पडणार धो धो पावसाच्या सरी 2022 - डिजिटल शेतकरी

पुढील 5 दिवस पडणार धो धो पावसाच्या सरी 2022

मुंबई – पावसाच्या कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने जोरात हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होऊ शकते. मंगळवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात येत  आहे.

अरबी समुद्राच्या किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितले  आहे. पुढील पाच दिवस वादळी वार्यसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली  आहे.

हे हि वाचा :-आले लागवड मसाला पिक

राज्यात येत्या पाच 5 दिवसनि  मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला  आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस जास्त पडत आहे. अद्यापही विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मान्सूनला सुरुवात झाली दिसत  नाही. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत मान्सूनला या भागातही सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने देण्यात आली  आहे.जागो जागी पाऊस हा पडत राहील.

 

Leave a Comment