राज्यात अनेक भागात पडला पाऊस 2022 - डिजिटल शेतकरी

राज्यात अनेक भागात पडला पाऊस 2022

पुणे : राज्यात अनेक भागात पडला पाऊस मॉन्सून पाऊस (Monsoon Rain) पडत असताना  राज्याच्या विविध भागात सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पाऊस पडत आहे. या पावसाने खरिपाच्या पेरण्यांना (Kharif Sowing) वेग वाढणार  आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही पावसामुळे दिलासा मिळनार आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची पुढील काही दिवसात  आवश्यकता आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४-३०  तासांमध्ये कोकणात पावसाची संततधार कायम होती. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे काही इतर  जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर पावसाची नोंद वर्तवण्यात आली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही काही टिकाणी  चांगल्या पावसाने हजेरी लावली. कळवण येथे ७५ मिलिमीटर पाऊस पडला आणि  या शिवाय नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या.

मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती . औरंगाबाद, परभणी, बीड, जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला दिसत आहे. मराठवाड्यासह विदर्भातही हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आणि  या पावसाने पेरण्यांना वेग येणार असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा अजून  कायम आहे.

पुढील काही तासामध्ये राज्यात पावसाची शकता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सोरुपाचा पाऊस होईल.

1 thought on “राज्यात अनेक भागात पडला पाऊस 2022”

  1. लातूर आणि बिदर जिल्हा कधी पाऊस पडेल ?

    Reply

Leave a Comment