Acid attack: शाळेत जाताना १७ वर्षीय मुलीवर असिड हल्ला; चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा - डिजिटल शेतकरी

Acid attack: शाळेत जाताना १७ वर्षीय मुलीवर असिड हल्ला; चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा

नवी दिल्ली : मास्कधारी दोन व्यक्तींनी दिल्लीमध्ये बुधवारी १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर  असिड हल्ला (Acid attack) केला आणि त्यात त्या मुलीचा चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा झालेल्या या मुलीवर सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या हल्ल्याबाबत दोन संशयितांची नावे पीडित मुलीने पोलिसांना सांगितली असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि या हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे. ( Acid attack )

ही मुलगी धाकट्या बहिणीसोबत  सकाळी शाळेत जात असताना दिल्लीतील उत्तमनगरामध्ये तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

संपूर्ण बंदी कधी : महिला आयोग ॲसिड विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही करत आहोत तसेच दिल्लीतील ॲसिड हल्ल्यानंतर तरी सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा दिल्ली महिला आयोगाने व्यक्त केली आहे. ( Acid attack )

Acid attack

घरातून निघाल्यानंतर लगेचच हल्ला

त्या मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, माझी मुलगी व तिची धाकटी बहीण शाळेत जाण्यासाठी घरातून सकाळी साडेसात वाजता निघाल्या होत्या.

त्यांनी घरासमोर रस्ता ओलांडला व मुलीवर ॲसिड हल्ला( Acid attack ) झाला आहे, घरातून निघाल्यानंतर अवघ्या सहा ते सात मिनिटांत ही घटना घडली. माझ्या धाकट्या मुलीने धावत येऊन हा सारा प्रकार सांगितल्याने आम्ही तडक घटनास्थळी गेलो होतो.

हे हि वाचा : आता कुळांच्या वारसांचा होणार ‘उद्धार’ : जमिनीची विक्री करता येणार काय आहे कायदा

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment