Animal Feed : उन्हाळ्यात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन चाऱ्याची गरज भागविली जात असते. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल केला जातो आणि त्यामुळे जनावरांचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होत असते. रवंथ कमी झाल्याने जनावरांना अपचनासारखे आजार होतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, दूध उत्पादनात घट दिसून येत असते Animal Feed.
Animal Feed उन्हाळ्यात जनावरांवर जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचाच ताण असतो आणि त्यामुळे जनावराची प्रजननाची क्रिया हि मंदावते. परिणामी या काळात जनावरे माजावर येण्याचे प्रमाणही कमी होतं तसेच अशा परिस्थीतीत जनावराला शरीर क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जायुक्त आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी वापरला जातो. मग जनावरांना कोणता उर्जायुक्त आहार पुरवायचा? तर जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण उत्तम राहण्यासाठी वारंवार थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा.
उच्च प्रतीच्या चारापिकांचा त्यांच्या आहारात समावेश करावा तसेच आहारात सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत का? हे पहावे आणि चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषणतत्वांची घनता वाढवावी आणि आहारातील पोषणतत्वांची घनता वाढल्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषणतत्त्वे उपलब्ध होतील. जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा तसेच चारा शक्यतो कुट्टी करूनच द्यावा आणि जनावरांच्या आहारात फक्त वाळलेला चारा न वापरता हिरवा आणि वाळलेला अशा दोन्ही प्रकारचा चारा मिसळून द्यावा Animal Feed ….
उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे तसेच यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ होईल. मात्र कधी कधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेची घनता वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा. असा बदल केल्यामुळे १ ते १.५ लिटरपर्यंत दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते. याशिवाय जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते.
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात स्निग्ध पदार्थाचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात तसेच यामध्ये तंतुमय पदार्थांची पचनक्रिया कमी होणे, कोटीपोटातील जीवजंतूना विषबाधा होणे, पचलेले अन्न शोषण्यात अडथळा येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो.
Animal Feed जनावरांच्या आहारात ५-७ टक्क्यांपेक्षा जास्त तेलबियाच्या पेंडीचा म्हणजेच फॅटयुक्त पदार्थाचा वापर करू नये. जनावरांना ३० ते ४० टक्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेलबियामधून देवू नये, तसेच ४० ते ४५ टक्यांपर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य व इतर घटकातून पूर्ण करावी तसेच त्याबरोबरच १५ ते ३० टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर आहारात करून पूर्ण करावी. जनावराच्या आहारात अशा प्रकारे बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतात आणि दूधही टिकून राहतं.