Gold : बापरे, एवढ्या रुपयेनी झाले सोने स्वस्त 2022 - डिजिटल शेतकरी

Gold : बापरे, एवढ्या रुपयेनी झाले सोने स्वस्त 2022

Gold : आज ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस एकीकडे केंद्र सरकारने काही बचत योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ दिली आहे, तर  व्यावसायिक सिलिंडरदेखील आज स्वस्त करण्यात आले  आहे तर दुसरीकडे बाजारभाव बघता आज सोन्याच्या ( Gold ) व चांदीच्या किंमतीदेखील कमी झाल्या असल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि यामुळे बाजारात खरेदीचा जोर वाढला आहे.

सध्या नवरात्रीमुळे सोन्याचे आणि चांदीचे ( Gold ) दागिने जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आज तुम्हाला ते स्वस्त झाल्याने परवडणार आहे आणि  जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) तुम्हाला माहीत हवी. आज तुम्हाला खरेदीची मोठी संधी (Gold) असून आज बाजारपेठेत ग्राहकांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं दिसत आहे पहा  चला तर मग जाणून घेऊया आजचे बाजारभाव..

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, आज (ता. 1 ऑक्टोबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि  तर 22 कॅरेट 100 ग्रॅम सोने 1500 रुपयांनी एवढे स्वस्त झाले आहे. भारतात 10 ग्रॅम (Gold)22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 46,500 रुपये एवढे झाले आहेत. आणि याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दरही आज 170 रुपयांनी कमी होऊन 50,730 रुपये झाले आहेत. तसेच तर चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास आज चांदी 1 किलोमागे 100 रुपयांनी घसरली असून आज 1 किलो चांदी 56,900 रुपयांना मिळत आहे.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे (Gold)दर:

▪️ चेन्नई – 46,900 रुपये

▪️ मुंबई – 46,500 रुपये

▪️ दिल्ली – 46,650 रुपये

▪️ कोलकत्ता – 46,500 रुपये

▪️ बंगळुरू – 46,550 रुपये

▪️ हैदराबाद – 46,500 रुपये

▪️ पुणे – 46,530 रुपये

▪️ लखनऊ – 46,650 रुपये

▪️ नागपूर – 46,530 रुपये

▪️ नाशिक – 46,530 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,160 रुपये

▪️ मुंबई – 50,730 रुपये

▪️ दिल्ली – 50,890 रुपये

▪️ कोलकत्ता – 50,730 रुपये

▪️ बंगळुरू – 50,780 रुपये

▪️ हैदराबाद – 50,730 रुपये

▪️ पुणे – 50,760 रुपये

▪️ लखनऊ – 50,890 रुपये

▪️ नागपूर – 50,760 रुपये

▪️ नाशिक – 50,760 रुपये

(तुमच्या शहरांतील सोने-चांदीचे दर देखील कमी होण्याची शक्यता असल्याने तुमच्या शहरातील अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्यावि.)

हे हि वाचा : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण होणार? पाम तेलाचे दर वर्षातील नीचांकी पातळीवर!

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “Gold : बापरे, एवढ्या रुपयेनी झाले सोने स्वस्त 2022”

Leave a Comment