मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे तसेच एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला गेला आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील नक्षलवाद्यांकडून जीवे(CM Eknath shinde) मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आलेल होते आणि पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या(CM Eknath shinde) सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
नलक्षलवाद्यांकून धमकी
महाविकास आघाडी सरकार काळातही गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे(CM Eknath shinde)यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली गेली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती मात्र धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता
हे हि वाचा : बापरे सोने झाले 1500 रुपयांनी स्वस्त, वाचा सोने-चांदीचे आजचे दर..