राज्य सरकारने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना (student)मोठा दिलासा दिला आहे आणि आता बोर्डाच्या परीक्षेत देण्यात येणाऱ्या सवलतीच्या गुणांना यापूर्वी मोजावे लागणारे 50 रुपयांचे शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सद्या पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांचा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त 50 रुपये अधिक आकारले जातील, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं गेले होतं. पण या निर्णयाचा विद्यार्थी आणि पालकांकडून जोरदार विरोध केला गेला आणि या मागणीमुळे सरकारने हे शुल्क आता विद्यार्थी हित लक्षात घेता थेट 25 रुपयांवर आणले आहे.
‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे गुण..
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारामध्ये सहभागी खेळाडू, एनसीसी, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येत असतात. तसेच या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत निकालाचा टक्का वाढवण्यास हे गुण हातभार लावत असतात.(student)
विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात आणि परंतु सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून प्रति विद्यार्थी 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येणार(student) होतं. आता हे शुल्क 25 रुपयांनी कमी करत आता विद्यार्थ्यांना फक्त 25 रुपये भरावे लागणार आहेत असं राज्य शिक्षण बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.