Buy Gold Diwali: धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेताय? ही काळजी घ्या, अन्यथा हाेईल फसगत 2022 - डिजिटल शेतकरी

Buy Gold Diwali: धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेताय? ही काळजी घ्या, अन्यथा हाेईल फसगत 2022

Goldसाेन्यातील गुंतवणुकीचे समीकरण जाणून घ्या –

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असते. या सणाच्या पर्वावर सोने खरेदी करणे शुभ मानले जात असते. अनेक जण सोने खरेदी करून गुंतवणुकीचा प्रारंभ करत असतात मात्र, सोने खरेदी करताना काही बाबतीत काळजी घेतली नाही तर कमी शुद्धतेचे सोने हाती पडू शकत आहे.

साेने ( Gold) खाेटे किंवा कमी शुद्धतेचे असल्यास माेठे नुकसान हाेते असते आणि त्याची विक्री कमी किमतीत होते. २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांचे अंतर असते. भविष्यात सोने तारण कर्ज घेण्याची गरज भासल्यास पदरी निराशा पडू शकत असते.

साेने (Gold) ही एक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जात असते. त्यामुळे ती किती प्रमाणात असावी, हे जाणून घेणेही अत्यंत महत्त्वाचे ठरते.  आणि एकूण पोर्टफाेलियाेच्या १० ते १५ टक्के हे प्रमाण असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या १५ ऑक्टोबर रोजीच्या दरानुसार, २४ कॅरेटचे सोने ५०,४४० रुपये प्रती १० ग्रॅम, तर १८ कॅरेटचे सोने ३७,८२९ रुपये प्रती १० ग्रॅम एवढे होते. तर, १७ ऑक्टाेबरला २४ कॅरेट साेन्याचा दर ५०,३१५ रुपये प्रती १० ग्रॅम हाेता आणि काही दिवसांमध्ये दर कमी झाल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह आहे.

प्रमाणित सोनेच घ्या : ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (बीआयएस) हॉलमार्क बघून प्रमाणित सोने खरेदी करा आणि शुद्धता कोड, टेस्टिंग सेंटर मार्क, ज्वेलर मार्क आणि मार्किंगची तारीख पाहून घ्या.

रोख पेमेंट करू नका, बिल घ्या : किंमत अनेक स्रोतांकडे (उदा. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट) पडताळून घ्या आणि रोखीने पैसे देऊ नका. यूपीआय (उदा. भीम ॲप) आणि डिजिटल बँकिंगद्वारे पैसे अदा करा आणि  डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारेही पैसे दिले जाऊ शकतात. ऑनलाइन मागवले असेल, तर पॅकेजिंग तपासून घ्या तसेच बिल घ्यायला विसरू नका.

विश्वासार्ह ज्वेलर, फेरखरेदी धोरण जाणून घ्या : फसवणूक टाळण्यासाठी करविषयक नियम पाळणाऱ्या विश्वासार्ह ज्वेलरकडेच सोने खरेदी करा आणि सोने ही एक गुंतवणूकही असते. त्यामुळे जेथून खरेदी करत आहात, तेथील फेरखरेदी (बायबॅक) धोरण काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. ज्वेलरच्या कर्मचाऱ्यांशी याबाबत बोलले पाहिजे.

घडणावळ खर्च पाहून घ्या : दागिन्याची घडणावळ (निर्मिती खर्च) किती लावण्यात आली हे तपासून घेतले पाहिजे. घडणावळ ३ टक्के ते ३० टक्के असू शकते आणि कारागिराने बनविलेल्या बारीक डिझाईनच्या दागिन्यांची घडणावळ सर्वाधिक, तर मशीनमध्ये तयार केलेल्या शिक्क्यांची घडणावळ सर्वांत कमी असते

हे हि वाचा : PM Kisan : या एका चुकीमुळं 4 कोटी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! ल‍िस्‍टमध्ये आपलं नाव तर नाही?

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

1 thought on “Buy Gold Diwali: धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेताय? ही काळजी घ्या, अन्यथा हाेईल फसगत 2022”

Leave a Comment