पुणेःCotton Market सध्या कापूस आणि सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम करणाऱ्या घटना चीनमध्ये घडत आहेत मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरानं मागील दोन महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. तर देशातील बाजारात आजही दरपातळी कायम होत आहे. मात्र सरकीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली आहे.
आधी आपण कापूस मागणीच्या बाजूनं काय सुरु आहे ते पाहू…
जगात कापसाचा मुख्य ग्राहक चीन आहे, हे आपल्याला सर्वाना माहितीच आहे. पण सध्या चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत आणि याचा चीनमधील बाजारपेठांवरही परिणाम होतोय. त्यामुळं चीन कापसाची खरेदी कशी करतो, हे पाहावं लागेल. तसंच चीनच्या खरेदीचा कापूस बाजारावर काय परिणाम होईल? याची चर्चाही आपण पुढे करणार आहोत.
जागतिक कापड बाजारातून मागणी कमी असल्याचं हा हंगाम सुरु झाल्यापासून सांगितलं जात आहे. मात्र तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले आहेत. म्हणजेच कापूस पुरवठ्याच्या बाजून म्हणजेच उत्पादनाच्या पातळीवर सर्वच ठिक आहे, असं म्हणता येणार नाही आणि त्याचं कारण म्हणजे, ब्राझील, अमेरिका आणि भारत या देशांकडून कापसाचा पुरवठा कमी राहण्याची शक्यता.Cotton Market
देशातील कापूस दर
भारतातील शेतकरी कमी दरात कापूस विकत नाही, त्यामुळं भारतातील दर टिकून आहेत आणि सध्या देशात कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक मर्यादीत असल्यानं कापूस या दरावर टिकून आहे तर सरकीचे दरही मागील दोन दिवसांमध्ये वाढून ३ हजार ४०० ते ३ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे.Cotton Market
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन दिवसांपासून कापसाचे दर तेजीत आहेत मात्र आजही कापूस दर वाढ होऊन वायदे ८८ सेंटवर पोचले होते आणि आपल्याकडच्या हिशोबानुसार हा दर १६ हजार रुपये क्विंटल होतो. देशातील वायदे १८ हजार रुपये क्विंटलवर आहेत. म्हणजेच आजही देशातील दर काहीसे जास्त आहेत.
चीनकडं लक्ष आवश्यक
चीनमध्ये कोरोना वाढत असल्याने भविष्यात चीनकडून कापसाला कशी मागणी राहीलं, याची स्पष्टता नाही आणि चीनची परिस्थिती लवकर पूर्वपदावर आली तर बाजाराला आधार मिळेल. पण शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन राहावं लागेल. कारण चीनच्या मागणीनुसार कापूस आणि सोयाबीन बाजार फिरत असतो सोबतच हेही लक्षात ठेवावं की, कापूस दरावर लगेच फार मोठा परिणाम होणार नाही. पण बाजारात चढ-उतार राहतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
हे हि वाचा : शेळीपालन योजना असा करा मोबाईल वरून अर्ज