Kharif Season 2023 : Cotton Variety महाराष्ट्रातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे नगदी पीक (Cash Crop) म्हणून कापूस पिकाकडे (Cotton Crop) पाहील जातं आहे. खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास २७ टक्के क्षेत्र एकट्या कापूस पिकाखाली येत असते.राज्यातील कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीखाली येत आणि शिवाय पावासाचा अनियमीतपणा, योग्य लागवड पद्धतीचा आभाव आणि कीड,रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कापूस पीकाची उत्पादकता (Crop Productivity) कमी येते.सध्याच्या परिस्थितीत कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकत आहे.
यामध्ये कापसाच्या बीटी वाणाची निवड(Cotton Variety) करताना काय काळजी घ्यायची आणि कपाशीतील कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापासूनच काय उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आणि कापूस पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी सातत्याने एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे कापसाच्या कोणत्या बीटी वाणाची लागवड करावी? कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाच म्हणजे बीटी वाण रसशोषक किडींना सहनशील असावं जेणेकरुन कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येणार आहे.
हे हि वाचा : मेथी लागवड माहिती तंत्रज्ञान
कोरडवाहू लागवडीसाठी कापसाचे बीटी वाण पाण्याचा ताण सहन करणारे असावे आणि सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण, उंची व फांद्यांची लांबी कमी असणारे कापसाचे वाण निवडावे.निवडलेले वाण आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारं असाव. याशिवाय त्याच्या धाग्याचे गुणधर्म सरस असावेत.
कोरडवाहू लागवडीसाठी बीटी कपाशीचे वाण कमी कालावधीचे म्हणजेच १४० ते १५० दिवसात तयार होणारे असावे तसेच मध्यम कालावधीचे म्हणजेच १५० ते १६० दिवस कालावधीचे असावे. तर बागायती लागवडीसाठी बीटी वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवसांचा असावा आणि कपसाच्या बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम म्हणजेच ३ ते ४ ग्रॅम तर बागायतीसाठी मोठा म्हणजेच ४ ग्रॅम असावा.
आता पाहुया कपसातील किडींचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर काय खबरदारी घ्यायची ते कापसाच्या पऱ्हाट्या व अवशेषाची शेतात, बांधावर किंवा गावात साठवण केली असेल तर असे अवशेष लगेच नष्ट करावेत आणि कपाशीच्या दीर्ष कालावधीच्या वाणाची लागवड करु नये.
पिकाची फेरपालट (Cotton Variety)करावी कारण बरेच शेतकरी एकाच जमिनीमध्ये दीर्घकाळापासून कापूस हे एकच पीक घेत असतात. त्यामुळे जमिनीमध्ये कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तसच पिकाचे उत्पादन देखील कमी येतं आणि पिकामध्ये शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर टाळावा. कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन,चवळी, झेंडू, मका,ज्वारी, राळा, भगर, एरंडी अशी आंतरपिके घ्यावीत निंबोळी अर्क बनविण्यासाठी आत्ताच कडुनिंबाच्या बिया म्हणजेच निंबोळ्या जमा करुन वाळवून ठेवाव्यात. अशा प्रकारे खबरदारी घेतल्यास कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.