Eat Leftover Rice: शिळा भात खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि त्यामुळे शिळा म्हणून नाक मुरडू नका, आनंदाने खा.
भारतीय थाळी भाताशिवाय अपूर्ण आहे आणि काहींना भाताशिवाय जमत नाही. डिनरमध्ये जर भात (Rice) नसेल तर, काहींना व्यवस्थित झोपही लागत नाही. काही वेळेस भात एक्स्ट्रा शिल्लक राहत असतो. रात्री उरलेला शिळा भात आपण फेकून देत असतो. मात्र, आपल्याला माहिती आहे का? की शिळा भात खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात.Eat Leftover Rice
भात शिळा राहिला तर आपण, फ्रिजमध्ये ठेवतो, किंवा सकाळी खराब झाला तर फेकून देत असतो. त्यामुळे शिळा म्हणून नाक मुरडू नका, आवडीने खा आणि शिळ्या भातामध्ये लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे अनेक पौष्टीक घटक आढळत असतात. शिळा भात खाण्याचे फायदे किती? याने आरोग्याला खरंच फायदा होतो का(Is It OK to Eat Leftover Rice?).
कुत्रा चावलाय? घाबरू नका, असे करा उपचार
या पद्धतीने करा शिळ्या भाताचे सेवन
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर रात्रीच्या वेळेस भात उरला असेल तर, मातीच्या भांड्यात साठवून ठेवा आणि त्यात थोडे पाणी देखील घाला. असे केल्याने भातामधील यीस्ट वाढेल आणि आपण शिळा भात नाश्ता किंवा जेवणाच्यावेळी खाऊ शकता. शिळ्या भाताला फोडणीही देऊ शकता तसेच यामुळे भाताची नासाडी होणार नाही. ज्यांना पोटाचे विकार आहे, त्यांनी आठवड्यातून २ ते ३ वेळा शिळा भात खावा.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
अनेक लोकं वेट लॉस जर्नीमध्ये आपल्या आहारातून भात वगळत असतात. जर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर, शिळा भात खा आणि शिळ्या भातात ताज्या भातापेक्षा कमी कॅलरीज असतात. तसेच उच्च फायबर आढळत असते. ज्यामुळे शिळा भात खाल्ल्यानंतर लगेच भूक लागत नाही आणि शिळा भात खाऊनही आपण आपले वजन नियंत्रणात ठेऊ शकता Eat Leftover Rice
बद्धकोष्ठतेपासून आराम
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजार निर्माण होतात तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार वाढतात. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत नाही. ज्यामुळे पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. सुमारे ४४-४५ टक्के लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा वेळी शिळा भात खा. कारण शिळ्या भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबरचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
ओडिशा, बिहार झारखंड, बंगाल मध्ये रात्री भाता मध्ये पाणी घालून जे होते त्याला पखाल म्हणतात. ह्या मुळे भातातील आम्ल वाढते व थोडी नशा सुद्धा येते. ह्याने अंगात शक्ती येते आणि उन्हाचा त्रास होत नाही.
please write in Hindi or English
so that can understand the post
Thanks
very Very good information 👌