Fertilizer purchase: खत खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी - डिजिटल शेतकरी

Fertilizer purchase: खत खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Fertilizer purchase: रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांमार्फत ऑनलाईन माहिती भरली जात आहे आणि हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे आहे. खत खरेदी करताना पीओएस मशीनवर संबंधित शेतकऱ्याची जात विचारण्यात येते. यामुळे खत खरेदी करताना हा जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Fertilizer purchase खत खरेदी करताना राज्यातील काही भागांत शेतकर्‍यांना POS मशिनवर आपली जात सांगावी लागत असल्याचं निदर्शनास आलं. म्हणून यावरून विधानसभेत काल (ता. 10 मार्च) विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आता केंद्र सरकारला याबद्दल बदल करण्यास सांगितले असल्याचं आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता नवीनच सुरू झालेली ही पद्धत केंद्र सरकार बंद करणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.

हे हि वाचा : ऑनलाईन वीज बिल भरण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsappखत खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Fertilizer purchase: खत खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी”

Leave a Comment