नवी मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आधीच ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गुरूवारी या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते.
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि या भेटीनंतर शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे असे सूत्राकडून समजले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिवसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का मानला जात आहे.
हे हि वाचा :कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस 2022
आधीच ठाण्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. कारण याआधी मागील २५ वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, ठाण्यातील एक दिग्गज नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेची वाटचाल अतिशय खडतर असल्याचे दिसत आहे आणि शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अद्याप शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही.
शिवसेनेच्या अडचणीत वाढ
मोठ्या कालावधीपासून ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व याआधी आणि आता हि राहिले आहे. शिंदे प्रदीर्घ काळ ठाण्यात सेनेचे प्रभारी होते म्हणून मात्र त्यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल कशी असेल अशी अटकळ बांधली जात आहे. अवघ्या काही महिन्यांतच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींना शिवसेना कशी सामोरे जाते हे पाहण्याजोगे राहणार आहे असेल.