Foxconn : मोबाइल कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; फॉक्सकॉन कंपनी भारतातील गुंतवणूक दुप्पट करणार - डिजिटल शेतकरी

Foxconn : मोबाइल कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; फॉक्सकॉन कंपनी भारतातील गुंतवणूक दुप्पट करणार

Foxconn : प्रत्येकाचे स्वप्न असलेला आयफोन निर्माण करणारी तैवान येथील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) भारतातील आपली गुंतवणूक दुप्पट करण्याच्या विचारात करत आहे.

यामुळे भारतातील एक लाखहून अधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळू शकणार आहेत तसेच कंपनीचे भारतातील प्रतिनिधी वी ली यांनी रविवारी लिंक्डइनवर पोस्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना याबाबत माहिती दिली गेली आहे.

या पोस्टमध्ये कंपनी दक्षिण आशियात गुंतवणूक दुप्पट करण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे म्हटले जात आहे. ली यांनी म्हटले की, भारतातील रोजगार, व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे आणि पुढच्या वर्षी वाढदिवसानिमित्त आणखी मोठी भेट देण्यासाठी आणि आणखी मेहनत करणार आहोत. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये विमानतळानजीक ३०० एकरावर प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यात आयफोन असेम्बल केले जाण्याची शक्यता आहे आणि या प्रकल्पातून एक लाखाहून अधिक जणांना नोकऱ्या मिळू शकत आहे.

भारतात ९ निर्मिती केंद्रे

फॉक्सकॉनची मूळ कंपनी होन हाई प्रिसिजन इंडस्ट्रीजचे चेअरमन यंग लियू यांना मागच्या महिन्यात भारतात गुंतवणूक वाढण्याचे संकेत दिले गेले होते. भारतात कंपनीची ९ निर्मिती केंद्रे आहेत आणि भारतातील या निर्मिती केंद्रांशी जोडलेल्या ३०हून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. चीन आणि अमेरिकेसोबत वाढलेल्या वादांमुळे कंपनीने अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे हि वाचा : महिंद्रा कंपनीने बाजारात आणले हलक्या वजनाचे सात ट्रॅक्टर, शेतकऱ्याला काय फायदा?

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment