Government Scheme : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत दोन योजना सुरू 2023 - डिजिटल शेतकरी

Government Scheme : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत दोन योजना सुरू 2023

Government Scheme: राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Corporation) राज्यातील तरुणांसाठी दोन योजना (Government Scheme) सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

यामध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज आणि शैक्षणिक कर्ज (Education Loan) अशा योजनांचा समावेश असून, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा शुक्रवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पाटील म्हणाले, की छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय बँकेशी चर्चा करण्यात आली आहे. बँकेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला गेला आहे.

यापूर्वी बँकेकडूनही तारण घेऊन कर्ज दिले जात होते आणि आता मात्र तारण घेतले जाणार नाही. त्यामुळे सहज कर्ज उपलब्ध होऊन व्यवसाय वृद्धी होण्यास मदत देखील होणार आहे.

तसेच शैक्षणिक कर्जामध्ये ४० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचा शासननिर्णय लवकरच काढला जाईल.Government Scheme

राज्यात २०१८ पासून ते आतापर्यंत ५७ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे आणि त्यांना ३ हजार ८५० कोटींचे कर्ज दिले आहे. या कर्ज व्याजाच्या रकमेचा परतावा ३६० कोटी रुपये महामंडळाने दिले गेले आहेत.

यामध्ये पुणे जिल्ह्यात ३०७२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे आणि त्यांना १९२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले गेले आहे. त्यासाठी १९ कोटींचा व्याजपरतावा दिला गेला आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय बँकेनी लाभ देताना समाधानकारक काम केलेले नाही आणि त्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येईल.

मागील वर्ष आणि पुढील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिक तरुणांना लाभ देण्याचे आश्‍वासन बँकेकडून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. आणि तसेच योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी बँकेना स्किम कोड देण्यात येणार असून, त्यामुळे पेंडिंग अर्जाची संख्या बँकनिहाय कळणार आहे.Government Scheme

योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक समन्वयक नेमला जाणार असून, जिल्हा स्तरावर एक अशा स्वरूपाची रचना केली जाणार आहे तसेच त्यामुळे आगामी काळात या योजनेचा लाभ सर्वसामान्य तरुणांपर्यंत पोहोचणार आहे.

हे हि वाचा : कडबा कुट्टी मशीन योजना २०२३ माहिती

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment