Gram Panchayat Order: आता महिला सरपंचांच्या पती किंवा नातेवाइकांच्या ग्रामपंचायतींच्या कारभारात लुडबुडीला लगाम बसणार असून या संदर्भात शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश काढला गेले आहे. यात अशी लुडबूड झाल्याचे दिसून आल्यास कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
सरपंचपतीची ग्रामपंचायतींमधील लुडबूड बंद
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे आणि त्यामुळे होते काय अनेक ठिकाणची सरपंच पदे महिला राखीव होतात. अशा वेळी पत्नीला निवडणुकीत उभे केले जाते आणि सर्व कारभार पतीराजच पाहतात. पती अथवा नातेवाईक यांच्या हस्तक्षेपाविरोधात अनेकदा आंदोलनेदेखील झालीली आहेत.
त्यामुळे महिला आरक्षणाच्या उद्देश सार्थकी लागत नव्हता आणि ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने सरपंच महिलेचे पती किंवा इतर नातेवाइकांनी ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप केला, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामुळे आगामी काळात महिला सरपंचांच्या पतीराजांची कारभारातील लुडबूड कमी होताना दिसणार आहे Gram Panchayat Order.

ग्रामसभेतही बसतात पतीराज
सरपंच महिलेचे पती किंवा नातेवाईक चक्क ग्रामसभेतदेखील समोरच्या खुर्चीवर बसत असतात. ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या ठरावांवरही सरपंचांचे पतीराजच निर्णय घेत असतात. काही ठिकाणी पतीराज बैठकांना बसतात आणि हे आता बंद होणार आहे. तसेच सरपंचांच्या कक्षात देखील त्यांच्या नातेवाइकांना बसता येणार नाही किंवा त्या ठिकाणी बसून कोणत्या निर्णयावर चर्चाही करता येणार नाही….