guava income : जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते आणि हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अत्यंत कमी पाण्यावर पेरू फळबाग यशस्वी करत पहिल्याच पिकात एकरी २५ टन विक्रमी उत्पादन घेतले गेले आहे.guava income
घुसाळकर यांना एकूण ११ एकर शेती असून त्यापैकी पाच एकर पेरू, चार एकर डाळिंब तर पाणी व्यवस्थापनासाठी एक एकर शेततळे आहे आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय भांड्याचे दुकान आहे. या व्यवसायाला बगल देत शेतीतून काहीतरी नावीन्यपूर्ण उत्पादन घेण्याचा मानस त्यांनी मनाशी बाळगला आहे. पत्नी सुरेखा, मुले दीपक व संदीप यांना बरोबर घेत त्यांनी या शेतीचे व्यवस्थापन केले आहे. जानेवारी २०१२ मध्ये किरण शेवाळे यांच्या अथर्व हायटेक नर्सरी (पाटेगाव जिल्हा अहमदनगर) येथून तैवान पिंक जातीची ३ हजार पेरूची रोपे १२ रुपये दराने आणली होती. ती रोपे ३ एकरात लागण केली आहे.guava income
सुरुवातीपासूनच व्यवस्थापन करण्यासाठी निमगाव केतकी येथील प्रसिद्ध फळ बागायतदार म्हणून नावलौकिक असलेले शेतकरी मच्छिंद्र भोंग यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. एकरी अडीच लाखप्रमाणे तीन एकरासाठी साडेसात लाख रुपये खर्च आला होता. आणि यातून पहिल्या पिकातच साठ टन पेरूचे उत्पादन निघाले होते. एक्कावन रुपये प्रमाणे जागेवर दर मिळाला असून तीस लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले आहे आणि आणखी १५ टन माल शिल्लक असून सध्याचा दर पंच्याहत्तर रुपये आहे. त्यामुळे अजून ११ ते १२ लाख रुपये उत्पादन मिळेल, अशी माहिती दीपक व संदीप घुसाळकर यांनी दिली आहे.guava income
पारंपरिक व्यवसायाला बगल देत शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची जिद्द मनी बाळगत पेरूची लागवड केली होती यासाठी योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतीमध्ये मेहनत केल्यास फळ नक्की मिळते. – पोपट घुसाळकर, शेतकरी
1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा

💰 ब्रेकिंग 👉 आता WhatsApp च्या माध्यमातून 15 हजार रुपये प्रति महिना कमवण्याची संधी!
📲 त्यासाठी Adbiz App लगेच डाउनलोड करा