Sugarcane management: आडसाली उसाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल ? 2022 - डिजिटल शेतकरी

Sugarcane management: आडसाली उसाचे पाणी व्यवस्थापन कसे कराल ? 2022

पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना पाण्याचा ताण बसत आहे आणि  आडसाली उसाची लागवड (Sugarcane) नुकतीच झालेली आहे. उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते. आडसाली उसासाठी हेक्टरी ३२५ ते ३५० लाख लिटर पाण्याची गरज भासत असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागत असतात. दोन पावसाळ्यामुळे आठ ते दहा पाणी कमी लागते आणि ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होत असते. तर उत्पादनात २० टक्के वाढ, खतामध्ये सुद्धा २५ टक्के बचत होत आहे. उस (Sugarcane)पिकातील पाणी व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती देली जात आहे

sugarcane

पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन कसे कराल?

– मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा आणि  ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्याने ओलावा तपासून खात्री करण्यात यावी.

– अति पाणी हे ऊस (Sugarcane) तसेच साखरेचे उत्पादन घटवते आणि  सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.

– फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते आणि  फुटवे कमी निघतात. उसाची उंच तसेच कांड्यांची लांबी वाढणे गरजेचे असते आणि  कारण यामध्ये साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.

हे हि वाचा : आडसाली ऊसामध्ये आंतरपिके

– उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे असते.

– सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे आणि  जमिनीत हवा खेळती असावी.

– सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते आणि त्यामुळे उगवन उशिरा आणि कमी प्रमाणात होते.

– पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात तसेच उगवून आलेले कोंबही मरत असतात आणि  उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नासते.

– आडसाली उसासाठी सरी वरंबा पद्धतीने लागवड केली असल्यास उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते आणि तरीही ऊस पिक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment