India T20 WC squad announced : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप(T20 WC) स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा अनेक दिग्गज ची होती. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, हे जवळपास निश्चित होत होते. त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना होती. (T20 WC)जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचे तंदुरूस्त होणे ही भारतासाठी खूप मोठी आनंदाजी गोष्ट आहे. मोहम्मद शमीच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या आणि दुपारी १ वाजल्यापासून मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघ(T20 WC) निवडीसाठी बैठक सुरू झाली होती. सलामीवीर, रिषभ पंत, रवींद्र जडेजाची रिप्लेसमेंट, मोहम्मद शमी व आर अश्विन यांचा समावेश आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती . तसेच दीपक हुडा व अक्षर पटेल यांची संघात निवड केली गेली आहे.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली सुद्धा आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत आणि उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ असा राहील(T20 WC) – रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक खालील प्रमाणे:-

23 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
1 thought on “India T20 WC squad announced : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; पहा कोण कोणाला मिळाली संधी 2022”