जम्मू: दक्षिण काश्मीर भागातील कुलगाम जिल्ह्यात गेल्या ४८-५० तासांत दोन काश्मिरी पंडितांच्या झालेल्या हत्यांमुळे जम्मू-काश्मीर हादरून गेले आहे. याचा परिणाम म्हणून काश्मिरी पंडितांनी सामूहिकरित्या खोरे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी १८००-१८५० काश्मिरी पंडितांनी जम्मू खोऱ्यातून स्थलांतर केले असून, जवळ-जवळ ३ हजार सरकारी तसेच अन्य कर्मचारी जम्मूत दाखल झाले आहेत. श्रीनगरच्या अनेक भागात काश्मिरी पंडितांची निवासस्थाने तसेच संबंधित परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच निमलष्करी पथकांचा मोठा बंदोबस्त तैनात उभा करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांची अनेक कारणे प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर पुन्हा एकदा जम्मू खोऱ्यात भयभीत तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. घराबाहेर पडू नका अनेक भागांमध्ये स्थानिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक पार पडण्याची असल्याची माहिती मिळाली आहे. हि या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर चाली चे बोलले जात आहे.
खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायन करण्याची घोषणा
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. अशा या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले असून, आता सामूहिक पलायनाच्या तयारीत आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनांनंतर आता काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्य झाल्या नंतर लगेच काश्मिरी पंडितांनी तातडीची बैठक बोलावली होती. काश्मिरी पंडितांनी ठरवले आहे की, ज्या भागात काश्मिरी पंडित आंदोलन करत होते, ते त्वरित बंद करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसमोर आता दुसरा पर्याय उरला नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे. बैठकीत सर्व लोकांना बनिहालच्या नवयुग बोगद्याजवळ एकत्र येण्यास सांगण्यात आव्हाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे आंदोलक रंजन झुत्शी म्हणाले की, गेल्या २२ दिवसांपासून सर्वजण आंदोलन करत आहे. आम्हाला यातून सुखरूप बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. विजय कुमार आणि रजनी बाला यांची निर्घृण अशी हत्या झाली. ज्या दिवशी राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्या दिवशी आम्ही सांगितले होते की, आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढण्यात यावे. जसे आम्ही १९९० मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे ३००० कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत असे सांगण्यात आले.