Land Record: आजोबांच्या संपत्ती वर किती अधिकार असतो?2022 - डिजिटल शेतकरी

Land Record: आजोबांच्या संपत्ती वर किती अधिकार असतो?2022

Land Record :आपल्याला आपल्या संपत्ती विषयी संपूर्ण माहिती असली पाहिजे, बऱ्याच लोकांना आपल्या संपत्ती बद्दल फारशी माहिती नसते आणि याच कारणामुळे काही लोक अश्या माहिती नसलेल्या लोकांच्या संपत्ती वर पाळद  ठेवून असतात. वेळ प्रसंगी हे लोकं संपत्ती साठी वाद निर्माण करत असतात  आणि अशा माहिती नसलेल्या लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि ह्या भोळ्या लोकांच्या जमिनी लुबाडत सुटतात.

Land Record जमिनीच्या वादामुळे अनेक ठिकाणी भांडणे मारामार्या  देखील होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमची जमीन सुरक्षित ठेवायची असेल तर जमिनी विषयी संपूर्ण माहिती असणे अतंत्य म्हत्वाचे आहे. कारण की अर्धवट माहिती असल्यास तुम्ही तुमच्या हक्काची जमीन देखील गमवू बसू  शकाल.Land Record

परिवारातील आजोबांच्या मालमत्तेवर नातवाला तसेच प्रत्येक सदस्याला किती अधिकार आहे हे आज घेणार आहोत

आपल्या पूर्वजांच्या जमिनीचे किंवा संपत्तीचे वाटप करणे म्हणजे एक किचकट प्रक्रियेतून जावे लागते. कारण की पूर्वजांना अनेक वारस जोडलेले असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपला आपला अधिकार गाजवत असतो. त्यामुळे पूर्वजांच्या जमिनी ह्या खऱ्या वारसास  व्यक्तीला मिळाल्या पाहिजे. या विषयी अपुरी माहिती असेल तर तुम्हाला तुमची जमीन ही मिळणे कठीण होऊन जाईल त्या साठी पूर्ण माहिती असणे आवशक आहे. कारण की पूर्वजांच्या जमिनी मिळविण्यासाठी अनेक जण कोर्टाची पायरी चडून त्यांच्या महत्वाचा वेळ आणि पैसा वाया घालवत असतात शेवटी निराशा येते.

Land Record

आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती

आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती हक्क असतो हे जर तुम्हाला माहिती नसेल  तर याचे उत्तर असे आहे की, नातू किंवा नातीचा त्यांच्या आजोबांच्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार हा वारस म्हणून  असतो. मग यामध्ये त्यांचे वडील हयात (जिवंत ) असेल तरी सुद्धा. नातवाच्या संपत्तीच्या बाबतीत नातवाच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या मृत्यूशी संबंध अजिबात  नसतो. नातू किंवा नात चा जन्म होताच ते त्यांच्या आजोबांच्या जमिनीचे एकप्रकारे हक्कदार (वारसदार) बनत असतात.Land Record

आजोबांची वडिलोपार्जित मालमत्ता यामध्ये संपत्तीचा वाटा कसा केला जातो? :-

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे आपले पूर्वज यांच्याकडून वारस हक्कानुसर मिळत असलेली जमीन मालमता असते. वडिलोपार्जित जमीन मध्ये आपले स्वतःचे वडील तसेच आपले आजोबा तसेच आपले पंजोबा त्यापेक्षा जास्त  इत्यादींचा समावेश हा होत असतो. ह्यांच्याकडून मिळणारी संपत्ती ही वारसा हक्काने मिळत असते कारण की हे आपले पूर्वज आहेत म्हणून . यांच्या मालमत्तेवर आपला अधिकार हा आपण जन्मतःच प्राप्त झालेला  असतो. जमिनीचा जो मूळ मालक असेल त्यांच्या मृत्यू झाल्यास त्यांच्या वारस दार यांना त्यांची जमीन हि मिळत असते.

वडिलोपार्जित संपत्तीवर मालमत्तेचा वाटा कसा केला जातो:-

आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर प्रत्येक मुळ वारसदारांना वाटा असला तरी सुद्धा आधीच्या पिढीचा संपत्तीचा वाटा हा आधी विचारत घेतला जात असतो आणि नंतर पुढच्या पिढीसाठी वाटा हा विभागून सारखा  देण्यात येत असतो. म्हणजे आपल्या आजोबांच्या किंवा पंजोबच्या जमिनीवर नातवंड यांचा वाटा विचारात घेतल्यास सुरुवातीला पंजोबा ची मुले नंतर त्यांची सुद्धा मुले असतील नंतर त्यांची मुले म्हणजे या ठिकाणी प्रत्येक चुलत भाऊ हा आजोबांच्या मालमत्तेचा काही प्रमाणात हक्कदार ठरत असतो हे माहिती पाहिजे.

land Act

वडिलोपार्जित संपत्तीवर सर्व नातवंडांचे हक्क कसे असतात? :-

आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर प्रत्येक नातवंड यांना समान अधिकार एकसारखा  असतो. जर जमीन वाद हा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या मालमत्तेचा असेल आणि या मध्ये त्या पंजोबा ला आता अनेक नातू हे वारसदार असतील अश्या वेळेस जर नातवाने नातवाच्या नातवाला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार दिल्यास जमीन कायद्यातील अधिकार नुसार कुणालाही वाट्या पासून वंचित ठेवता येत नसते प्रत्येकाला हा न्याय हा मागता येत असतो.

हे हि वाचा : Land Record मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

आजोबांच्या स्वतः कष्टाने कमविलेल्या मालमत्तावर अधिकार कसा असतो:-

आजोबांनी मालमत्ता ही स्वतः कष्ट करून विकत घेतली असेल तर अशा आजोबांनी विकत घेतलेल्या मालमत्तेवर नातवाला जो जन्म होताच वारसा हक्काने अधिकार मिळत होता, तो इथे नातवाना  लागू होत नाही इथे नातवाचा अधिकार नसतो. जर ती जमीन आजोबांनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे नातवाच्या वडिलांच्या नावावर केली असल्यास त्यावरच म्हणजेच वडिलांच्या मालमत्तेवरच नातवाच्या हक्क असतो तेव्हाच नातू अधिकार गाजू शकतात इतरत्र नही. अश्या वेळेस आजोबा यांच्या मालमत्तेवर नातू थेट दावा ठोकू शकत नाहीत.Land Record

ती जमीन किंवा मालमत्ता आजोबा कुणालाही देऊ शकतात दान हि करू शकतात. जर आजोबा हे मृत्यूपत्राशिवाय मरण पावले तर अश्या वेळेस आजोबा यांच्या मालमत्तेवर त्यांची स्वतःची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचाच हक्क असेल किंबहुना वारस हक्क. या ठिकाणी नातवंड यांना हकक मिळत नसतो.या मालमत्तेवर दुसर कोणीही  वाटा ( हस्तक्षेप ) मिळवून घेऊ शकत नाही कारण ती जमीन वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या स्वताच्या वारसदार जसे की पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनाच मिळत असते.

सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

4 thoughts on “Land Record: आजोबांच्या संपत्ती वर किती अधिकार असतो?2022”

  1. पणजोबाच्या नावावरील जमीन शासनाने ताब्यात घेतली असेल तर पण तू ला परत घेता येते का

    Reply
  2. ही माहिती फार चांगली आहे पण हे कोणत्या कायद्याच्या कोणत्या सुत्रा प्रमाणे आहे हे सांगाल का?

    Reply
    • याला लिमीटेशन नाहीत का समजा वाटणी होउन 25 वर्षे झाली तरी पण तुम्ही कोर्टात जाताय कोर्ट पण तारीख देतय याला काय अर्थ आहे का तेला तेचा हिंसा देऊन पण आज आमच्या वावरातून रस्ता चालला
      मनुन. आम्हाला पैसे भेटनार मनुन आमचे वर केस पैसे चे लोभापाई

      Reply

Leave a Comment