Land Record Entry : एका गावात खंडू आणि पांडू नावाचे दोन सख्खे भाऊ वडिलोपार्जित शेतजमीन एकत्रितरीत्या कसत होते. खंडू थोरला भाऊ होता. खंडू चावडीवरचे सर्व व्यवहार बघायचा व घरातील इतर सगळा कारभार पण तोच पाहत होता. (Land Record Entry) धाकटा पांडू मात्र हा शेतीत राबायचा. सन १९७२ मध्ये गावांत एकत्रीकरण योजना म्हणजे गटवारी आली. सरकार लोकांच्या जमिनीचे वेगवेगळ्या ठिकाणचे तुकडे एकत्र करून जमीन खातेदारांना एका ठिकाणी देणार आहेत एवढेच सरकारच्या या योजनेबद्दल गावातील लोकांना समजले होत होते.
सरकारच्या या योजनेमध्ये गटवारीत जमीन कमी-जास्त होत नाही, असे कारभारी खंडू पांडूला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितले होते. काही दिवसांतच सरकारचे जमीन एकत्रीकरण योजनेचे काम सुरू झाले होते.
या योजनेमध्ये गावातील सातबारा बुक आणि तलाठ्याचे गावातील सगळे रेकॉर्ड भूमापन खात्याकडे गेले आणि तब्बल पाच वर्षे हे रेकॉर्ड गटवारीच्या खात्याकडे होते. पाच वर्षांनंतर जेव्हा गटवारीचे रेकॉर्ड गावात आले तेव्हा एक महिना चावडीवर गावातील सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्ड (Land Record Entry) पाहायला उपलब्ध करुण दिले गेले होते. पांडूने धाकटा भाऊ खंडूला आपल्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड बरोबर असल्याचे सांगितले गेले होते.
या सगळ्या गटवारीच्या योजनेनंतर आता बरीच वर्षे उलटली आहे आणि या कालावधीपर्यंत खंडू व पांडू यांचे वय झाले होते. धाकटा पांडू याची मुले आता मोठी झाली होती. मुलांनी जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे काढली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपले चुलते खंडू यांच्या नावावर चार एकर जमीन जास्त होती व सर्व जमीन बागायत होती. पांडूची मुले एका वकिलाला भेटली.
वकिलाने सर्व कागदपत्रे घेऊन सुरवातीला पीकपाहणी बद्दल केस सुरू केली आणि त्यात त्यांचा दोन वर्षे कालावधी उलटूनही जमीन ताब्यात न आल्यामुळे पांडूच्या मुलांनी दिवाणी कोर्टात मनाईचा दावा लावला. त्यानंतर परत चार वर्षे उलटली होती.(Land Record Entry)
नंतर मुलांनी चुलता खंडूच्या विरुद्ध जमीन वाटपाचा वेगळा दावा लावला व महसूल कोर्टात नोंदी विरुद्ध एक अपील केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रेकॉर्डमध्ये चार एकर जमीन ज्या तुकडेबंदी कायद्यानुसार लागली त्या तुकडेबंदी कायद्यानुसार मात्र कोणताच अर्ज वकिलाने संपूर्ण कालावधीत केला नाही.
सांगायचे तात्पर्य म्हणजे एखाद्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर नेमके कशात आहे, हे त्या प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय कळू शकत नाही. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये पूर्वी झालेली चूक केव्हा झाली व कशामुळे झाली हे कळल्याशिवाय ती चूक दुरुस्त करणे अवघड असते आणि नाहीतर भलतीकडेच प्रयत्न म्हणजे दगडावर डोके आपटल्यासारखे आहे.
त्या नंतर कोर्टातून खंडू कडून ४ एकर जमीन काढून पांडूला देण्यात आली. मुळशी गेले कि माहिती हि भेटत असती गावातील चागले जाणकार यांचाशी चर्चा करून मर्ग काढावा.